डाॅ. सुरेश साबळेंनी दाखवून दिले होते की, जिल्हा शल्य चिकित्सकाचे काय काम असते
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.सतिष दयाराम सूर्यवंशी यांची नियुक्तीचे आदेश राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी (ता. पाच) काढले. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डाॅ. सुरेश साबळे यांनी जिल्हा रुग्णालयात चांगले काम केले. जिल्हा शल्य चिकित्सक काय असतो हे साबळे यांनी दाखवून दिले होते.
बीड जिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक पदावर डॉ.सुरेश साबळे यांनी चांगले काम करत, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी विशेष पुढाकार घेतला होता. त्यांच्या जागी आता नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक असलेले डॉ. सतीष दयाराम सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.