बीड (प्रतिनिधी) गेल्या ६ महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यासांठी बीड जिल्ह्यात संघर्ष सुरु आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रखडलेला पीकविमा, बीड तालुक्यातील पूर्वेकडील गावांना कुंडलिकाचे पाणी वॉटर लीफ्टींग करणे, भांगेवाडी येथे जलसिंचन प्रकल्प उभारणी, मांजरसुंभा महसूल मंडळाला रखडलेली अतिवृष्टीची नुकसाभरपाई देण्यात यावी व लोडसिडिंग मुक्त बीड जिल्हा करावा यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांना शासनाकडून सोडवले जात नसल्याने
27 एप्रिल २०२२ रोजी सकाळी 10:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा धडकणार असून आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी आंदोलक धनंजय गुंदेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांचे पीकविमा, पाणी व नुकसान भरपाई साठी आंदोलन सुरू आहे. रास्ता रोको आंदोलन, एकाचवेळी ५२ गावांमध्ये ठिय्या आंदोलन, १२२ गावांमध्ये आक्रोश आंदोलन करूनही प्रशासन कसलीही दखल शेतकऱ्यांची घेत नाही, साधे आंदोलकांना उत्तरही दिले नाही इतके प्रशासन ढिम्म झाल्यामुळे आसूड मोर्चा काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकरी आंदोलक धनंजय गुंदेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बीड तालुक्यातील गावोगाव पिंजून काढल्यानंतर आसूड मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली होती. हीच ती वेळ … शेतकऱ्यांची एकजूट आणि ताकद दाखवायची … !
आज होणाऱ्या आसूड मोर्च्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी आंदोलन समन्वयक धंनजय गुंदेकर व सहकार्यांनी केले आहे.