आ.मिटकरी यांच्या वक्तव्याने सामाजिक तेढ – राजेंद्र मस्के
बीड प्रतिनिधी
परवा राष्ट्रवादीच्या इस्लामपूर येथील सभेत आ. अमोल मिटकरी यांनी मुक्ताफळे उधळली. बेताल वक्तव्य करून ब्राह्मण समाजाची बदनामी केली. सनातन हिंदू धर्मातील विवाह संस्काराची टवाळकी करत हिंदू धर्माचा अवमान केला. आ. मिटकरी यांच्या वक्तव्याने सामाजिक तेढ निर्माण झाली.असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे. आज बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने धोंडीपुरा बीड येथे भाजपा जिल्हाध्यक्ष मा.राजेंद्र मस्के शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी भाजपा नगरसेवक जगदीश गुरुखुदे, सलीम जहांगीर यांच्या प्रमुख उपस्थितीत,ब्राह्मण समाज व सनातन हिंदू धर्मातील विवाह संस्करा बाबतीत बदनामीकारक वक्तव्य करणारे राष्ट्रवादीचे आ. अमोल मिटकरी यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी. जि.प.सदस्य अशोक लोढा, परशुराम गुरखुदे, डॉ. लक्ष्मण जाधव, प्रमोद रामदासी, बालाजी पवार, शांतीनाथ डोरले, अनिल चांदणे, संदीप उबाळे, विलास बामणे, प्रमोद पुसरेकर, नरेश पवार, भालचंद्र कुलकर्णी, दत्ता परळकर,मनोज ठाणगे, बाबूलाल ढोरमारे, संतोष गवळी, संगीता धसे, छाया मिसाळ, शीतल राजपूत, प्रित कुकडेजा, कल्याण पवार, नागेश पवार, सलील कुलकर्णी, किरण देशपांडे, वैभव वैद्य, गजानना जोशी, चंद्रकांत जोशी, राजेश चरखा, भाऊसाहेब गोरे, शरद कुलकर्णी, बाळासाहेब जोशी, अक्षय कुलकर्णी, अनंत नागरगोजे, प्रल्हाद चित्रे, शुभम कायंदे, बद्रीनाथ जटाळ, विद्याधर खडकीकर, विठ्ठल ठोकळ, आदि सह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
ब्राह्मणद्वेष आणि हिंदू धर्माचा तिरस्कार करत आ. मिटकरी यांचा राजकीय पिंड तयार झालेला आहे. तिव्र द्वेष भावनेतूनच कायम यापूर्वी भूमिका मांडत आले. याची जाणीव असताना सुद्धा राष्ट्रवादी पक्षाने त्यांना आमदारकी बहाल करून आपलं जातीय धोरण स्पष्ट केले . मत मागताना जात पाहायची आणि सत्तेत आल्यानंतर आ.मिटकरी सारख्या विदूषका मार्फत जातीय आघात करायचा. ही वाईट परंपरा राष्ट्रवादी पक्षाने सुरु केली. आ.मिटकरी यांना पाठीसी घालून जातीय द्वेषाची भुमीका राष्ट्रवादीने चिन्हांकित केली. अशा दुटप्पी धोरणा सामाजिक सलोखा बिघडतोय.प्रदेशअध्यक्ष आणि सामाजिक न्यायमंत्री यांच्या दस्तूरखुद्द साक्षीने ब्राह्मण समाज आणि करोडो हिंदू धर्मियांनी स्वीकारलेल्या विवाह संस्काराची कुचेष्टा केली जाते. यापेक्षा दुर्भाग्य कोणते.
जनतेने मागणी करूनही अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. समाजातील संतप्त भावना लक्षात घेऊन राष्ट्रवादीने मिटकरी यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.