आता तरी बीडला पोलीस अधिक्षक म्हणून खमक्या अधिकारी द्या.!
प्रारंभ न्युज
बीड : बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्या नंतर अधिवेशनात बीडचे पोलीस अधिक्षक यांची तक्रार करण्यात आली होती. याची दखल घेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. यानंतर अखेर बीडचे पोलीस अधिक्षक आर राजा यांची आज बदल करण्यात आली आहे. परंतु बीडला अजून नविन पोलीस अधिक्षकांची नियुक्त करण्यात आलेली नाही. आता तरी जिल्ह्याला खमक्या अधिकारी देण्यात यावा अशी मागणी होत आहे.
गेल्या १८ महिन्यापासून बीड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक म्हणून आर राजा हे काम पाहत होते. परंतू त्याच्या या कार्यकाळात जिल्ह्यात प्रचंड माफियाराज निर्माण झाले होते, पण आता त्यांची बदली झाल्यामूळे जिल्ह्यातील हे माफियाराज संपणार आहे का? परत तीच परस्थिती राहील? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचे पुर्ण तीनतेरा वाजले होते. पोलीसांची दहशत कमी झाली होती. परंतु आयपीएस म्हणून जिल्ह्यात आलेले पंकज कुमावत यांनी वर्दीची लाज राखली होती. त्यांनी दोन नंबरवाल्याचे कंबरडेच मोडले होते. बीड ला १८ महिने काम पाहणारे पोलीस अधिक्षक आर राजा यांची बदली झाल्यानंतर जिल्ह्यात आता खमक्या अधिकारी देण्यात यावा अशी मागणी होत आहे. जिल्ह्यात वाळू, मारामार्या, खुन, गोळीबार, गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून हे रोखणे येणार्या पोलीस अधिक्षकासमोर आव्हान असणार आहे