प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात इतर राज्यातुन गुटख्याची आवक होते, हा सर्व गुटखा कंटेनरमधुन जिल्ह्यात आणण्यात येतो. गुटख्याचे कंटनेर कोणते आहे, ते कोठून येते, कोणत्या राज्यातुन येते, तो गुटखा कोणाचा आहे यासह इतर माहिती संबंधित विभागला असते. परंतु यासर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यात येते. मध्यंतरी आयपीएस पंकज कुमावत यांनी मोठ्या प्रमाणात अवैद्य गुटखा प्रकरणी कारवाया केल्या होत्या. त्यावेळेस जिल्ह्यात गुटखा माफियांवर दहशत निर्माण झाली होती. परंतु परत जिल्ह्यात गुटखा विक्री जोमात होऊ लागली आहे.
राज्यात गुटखा विक्रीस बंदी असताना सुद्धा बीड जिल्ह्यात गुटखा मोठ्या प्रमाणात विक्री होतो. हा गुटखा कोणत्या राज्यातुन बीड जिल्ह्यात येतो, तो गुटखा जिल्ह्यात कसा आणला जातो याची माहिती यंत्रणेला असते. गुटखा माफियांवर कारवाया होत नसल्यामुळे जिल्ह्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री होत आहे. अन्न व औषध विभागत जिल्ह्यात नसल्या सारखाच आहे. या विभागाकडून आज पर्यंत गुटखा माफियांवर विशेष अशी कारवाई आज पर्यंत करण्यात आलेली नाही. यामुळे अन्न प्रशासन विभागाचे नेमके काम काय आहे हा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. कारवाया झाल्यातरी त्या फक्त छोट्या गुटखा विक्री करणाऱ्यांवर होतात. जे मुख्य आहते त्याच्यावर कारवाई का होते नाही. त्यांच्यावर जर कारवाया झाल्या तर जिल्ह्यात गुटखा विक्री आळा बसेल.