प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्या नंतर गृहमंत्री यांनी बीडचे पोलीस अधिक्षक यांना तात्काळ रजेवर पाठवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. परंतु आज चौथ्या दिवस आला तरी गृहविभागाकडून कोणतीच हालचाल दिसत नाही. यामुळे सक्तीच्या रजेची घोषणा फक्त हवेतच असल्याचे दिसत आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून जिल्ह्यात चोऱ्या, खुन, मारामाऱ्या, अवैद्य गुटखा, अवैद्य वाळू उपसा, पत्याचे क्लब, सावकारकी यासह इतर दोन नंबरच्या धंद्यांनी डोकेवर काढले होते. यासर्व बाबींवर माजलगाव मतदार संघाचे आमदार, बीड मतदार संघाचे आमदार, केज मतदार संघाच्या आमदार यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी (ता. 07) सांगितले होते की, बीडचे पोलीस अधीक्षक यांना तात्काळ रजेवर पाठवण्यात येईल पण आज तीन दिवस झाले तरीही गृहविभागाकडून कोणत्याच हालचाली दिसून येत नाही. यामुळे सक्तीच्या रजेची घोषणा फक्त हवेतच असल्याचे दिसत आहे.