प्रतिनिधी :बीड
8 मार्च, जागतिक महिला दिनानिमित्त जगभर महिलांचा आदर, सन्मान, सत्कार होत आहे.
महिलांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले जाते. आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या पायावर उभी असून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असते, मग ती नोकरी असो, घर सांभाळणे असो, मजुरी असो, की शेतातील काम असो ती कुठेही मागे नाही. काल महिला दिनानिमित्त महिलांसाठी अनेक ठिकाणी अनेक मोठमोठे कार्यक्रम आयोजित केलेले होते त्या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद सगळ्या स्तरातील महिला लुटत होत्या परंतु त्याच वेळी जागतिक महिला दिना निमित्त बीड जिल्ह्यातील खरी कर्तृत्ववान महिला म्हणजे ऊसतोड महिला आहे. महिलादिन जगभरात मोठ्या उत्साहात ठीक ठिकाणी साजरा झाला परंतु बीड जिल्यातील कर्तुत्ववान ऊसतोड महिला सन्मानापासून वंचित राहिली तिचा सन्मान उसाच्या फडात जाऊन करण्याचे आम्ही ठरवले आणि आज 9 मार्च 2022 रोजी वडवणी तालुक्यातील मौजे दुकडेगाव येथील दोन निरनिराळ्या उसाच्या फडामध्ये जाऊन या ऊस तोडणाऱ्या महिला भगिनींच्या हस्ते मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून महिला दिनाचा कार्यक्रम घेतला यावेळी त्यांना फूल ना फुलाची पाकळी म्हणून आमच्या वतीने 25 महिलांना साडी, गुलाबपुष्प भेट देण्यात आल्या. तसंच तिथे उपस्थित सर्वांसह फळं केळी, चिकू असा अल्पोपहार घेण्यात आला.
ऊस तोडण्याचे सर्वांत कठीण काम करणाऱ्या आमच्या सर्व भगिनींना महिलादिनानिमित्त सलाम.
खरंतर ऊस तोड मजुरी ही बीड जिल्ह्याला लागलेला कलंक आहे किमान या पुढच्या पिढीने शिक्षण घ्यावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे ऊस तोडण्याचे काम करू नये याच सदिच्छा आजच्या या जागतिक महिला दिनानिमित्त व्यक्त करूया.हा कार्यक्रम ॲड.अर्चनाताई सानप,मिनाक्षिताई मुंडे, मनिषाताई पवार, ज्योतिताई खंदारे,कोमल मस्के,अभिजित सोळंके या युवा संघटनेने मिळून संपन्न केला .त्यावेळी दुकडेगावच्या सरपंच सुमित्रा आव्हाड, सामाजिक कार्यकर्त्या सविताताई बडे, मुद्रिका बडे, छाया बडे, बालासाहेब बडे, ग्रामस्थ व इतर ऊसतोड मजूर उपस्थित होते.