बीडच्या कर्तृत्वान महिलांचा “नारीशक्ती” पुरस्काराने गौरव
बीड(प्रतिनिधी)ः येथील सौै.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व बन्सल कोचिंग क्लासेस बीड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च 2022 रोजी सौ.के.एस.के.महाविद्यालयात गौरव नारी शक्तीचा हा कार्यक्रमात भव्य फॅशन शो स्पर्धा,कर्तृत्ववान महिलांचा सन्मान,सांस्कृतिक कार्यक्रम प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर व डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर,प्राचार्य डॉ.दीपाताई क्षीरसागर,डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर, डॉ.सौ.सारीकाताई क्षीरसागर, श्रीमती मिनाताई तुपे,सोनी जमधाडे,सुप्रिया शेळके तसेच बन्सल कोचिंग क्लासेस बीडचे शाखा व्यवस्थापक श्री.सचिन चव्हाण सर इत्यादींची उपस्थिती होती.
यावेळी विविध क्षेत्रात विशेष व भरीव कामगिरी करणार्या महिलांच्या कर्तृत्वाचा पाहुण्यांचा हस्ते स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र,शेला देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात श्रीमती प्रज्ञाताई रामदासी,मनिषा तोकले,अनुराधा चिंचोलकर,डॉ.देवयाणी खरवडकर,मंजुषा कुलकर्णी,ज्योती मुनोत,आशाताई शिंदे,वैशाली नहार,हेमा विभुते,डॉ.उज्वला वनवे,सय्यद मिनाबी वहियोद्दीन,डॉ.सुनिता बारकुल,डॉ.प्रज्ञा तांबडे,प्रितीताई गर्जे,सोनल पाटील,संगीता कोठारी,जयश्री बारगजे,पुनम खराडे,श्वेता घाडगे,सोनल नहार, प्रतिभा सांगळे,प्रणोती चैतन्य यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम व भव्य अशी फॅशन शो स्पर्धा संपन्न झाली.यामध्ये महिला व मुलींनी विविध पेहराव,वेशभूषा धारण करून सहभागी झाल्या होत्या.त्यामध्ये परिक्षकांनी क्रमांक काढून प्रथम क्रमांक मंजू खेडकर,द्वितीय, तृतीय पल्लवी कुलकर्णी व अंजली गवई यांना मिळाला.
यावेळी प्रास्ताविकात डॉ.सारिकाताई क्षीरसागर म्हणाल्या की, महिला सशक्तीकरणासाठी स्व.काकूंनी अथक प्रयत्न करून अनेक महिलांना मुख्य प्रवाहात आणले.आजची महिला वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे.स्त्री ही मानवतेचा केंद्र बिंदू आहे असे त्या म्हणाल्या.
महाविद्यालयाच्या प्राचार्य महिलांना उपदेशून बोलताना म्हणाल्या की,आपल्यातील सुप्त गुणांना चालना दिली पाहिजे.जिजामाता,झाशीची राणी,माता रमाई,सिंधूताई सपकाळ,जिजामाता,सावित्रीबाई फुले या महिलांनी प्रतिकूल परिस्थितीही आपल्या व्यक्तीमत्वाचा ठसा उमटवला.महिलाच्या अंगी जिद्द,चिकाटी,मेहनत असून ती प्रत्येक क्षेत्रात कामगिरी करत आहे.आजची महिला अबला नसून ती सबला आहे असे त्या म्हणाल्या.
बीड शहराचे नगराध्यक्ष म्हणाले की, महिला आज आपल्या कर्तृत्वातून वेगवेगळया पदावर पोहोचल्या आहेत.त्यांच्या कार्याचा सन्मान आपण केला पाहिजे.सर्वांनी समानतेची जाणीव लक्षात ठेवून महिलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. स्र्त्रीला सामान दर्जा दिल्यामुळे समाजाची, देशाची उन्नती होत आहे. आपल्या कार्य कर्तृत्वातून समाजात आपली ओळख प्रस्थापित करणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा मानसन्मान करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो आणि आम्ही ते वेळोवेळी करत आलो आहोत नगर पालिकेच्या माध्यमातून महिलांसाठी आदर्श असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धकृती पुतळ्यांची उभारणी केली. महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी बीड नगर पालिकेने महाराष्ट्रात पहिल्या मॉलची उभारणी केली. तसेच बीड नगर पालिकेने 500 ते 600 महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य देऊन स्वावलंबी बनवले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, रिल स्पर्धा इ.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.संजय पाटील यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हयातील कर्तृत्ववान महिला,मुली, परिसरातील महिला,मुली व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.