प्रारंभ वृत्तसेवा
बीड : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ना. धनंजय मुंडे यांनी 2019 ला पदाभार घेतला होता. तीन वर्षाचा कार्यकाळ संपत आला तरीही ना. मुंडे यांना जिल्ह्यात विशेष असे कार्य करता आलेले नाही. त्यांच्या कार्यकाळत जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी वाढली, गुन्हेगारांना कायद्याचा कसलाच धाक राहीलेला नाही. खुलेआम गुन्हेगार दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतायेत, जिल्हा प्रशासनावर पालकमंत्री म्हणून कसलेच नियंत्रण दिसत नाही, जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष असे कोणतेच कार्य केलेले दिसत नाही, त्यांच्याच पक्षातील आमदार विरोधात जात आहेत. यासर्व बाबींवरुन पालमंत्री धनंजय मुंडे यांना आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे असेच म्हणावे लागेल.
बीड जिल्हा हा मुळात विकासापासून कोसोदुर असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात बेरोजागारीचे प्रमाण जास्त असून येथील लाखो नागरीक रोजगाराच्या शोधात इतर राज्यात व मोठ्या शहरात जाऊ लागले आहेत. जिल्ह्यातच बेरोजगारांना काम मिळेल यासाठी मात्र पालकमंत्री या नात्यांने ना. धनंजय मुंडे यांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज होती. परंतु त्यांनी याकडे मात्र आज पर्यंत दुर्लक्ष केलेले आहे. यासह जिल्ह्यातील उसतोड कामगारांच्या हातातील कोयता काढण्यासाठी सुद्धा पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच जिल्ह्याच्या विकासाठी राज्य सरकारकडून विशेष निधीची तरतुद करुन जिल्ह्याचा विकास करण्याची गरज आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत बीड जिल्हा हा विकासापासून कोसो दुर असलेला जिल्हा आहे. यामुळे बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सर्वांनी मिळून विशेष कार्य करण्याची गरज आहे. परंतु आज पर्यंत जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष पुढाकार घेण्यात आलेला नाही. यामुळे बीड जिल्हा आज सुद्धा विकासापासून खुप दुर आहे.
साहेब अजून सुद्धा वेळ गेलेली नाही
ना. पालकमंत्री साहेब अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. आपल्याकडे अजून दोन-अडीच वर्षाचा कार्यकाळ आहे. या कार्यकाळात आपण जर ठरवले तर जिल्ह्याचा कायापालट आपण करु शकता. तुम्हाला मिळालेल्या पदाचा फायदा जिल्ह्यासाठी कसा होईल यासाठी आपण पुढाकार घेण्याची गरज आहे. खुप कमी काळात आपण खुप मोठ्या उंचीवर गेलेले आहात, याच उंचीचा फायदा जिल्ह्यासाठी कशा करता येईल यासाठी सुद्धा आपण विशेष लक्ष देण्याची गरज आहे. हीच योग्य संधी आहे जिल्ह्याच्या विकासासाठी पुढाकार घेण्याची. आपण सुद्धा इतरांसारखे केले तर नेहमीप्रमाणे मतदार भविष्यात इतरांना संधी देतील यात मात्र शंका नाही.
ह्या बाबीमुळे तुम्हाला आत्मचिंतन करावेच लागणार…!
ना. धनंजय मुंडे साहेब आपण बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. पालकमंत्री या नात्याने तुमच्यावर खुप मोठ्या जबाबदाऱ्या होत्या परंतु यासर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यात तुम्हाला पुर्णपणे अपयश आलेले आहे. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असताना सुद्धा आपण याकडे दुर्लक्ष केले, जिल्ह्याच्या विकासाठी विशेष निधी आणण्यात तुम्हाला अपयश आले, येथील बेरोजगारांंच्या हाताला काम तर मिळालेच नाही परंतु ज्यांच्या हाताला काम होते ते सुद्धा गेले, महिलांना जिल्ह्यात विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे, तुमच्याच पक्षातील आमदार विरोधात गेले आहे. यासह इतर बाबीमुळे तुम्ही एक वेळेस आत्मचिंतन कराच म्हणजे तुमचे नेमके कुठे चुकते हे तुमच्या लक्षात येईल…