प्रारंभ वृत्तसेवा
मुंबई : भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर (वय 92) यांचे आज निधन झालं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी साडे बारा नंतर अंत्यदर्शन घेता येणार तर रात्री आठ वाजता शिवाजी पार्क याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यासोबत त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. लता मंगेशकर यांना करोनाची सौम्य लक्षण जाणवत होती. त्यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.