शंभर कोटीच्या विकास आराखड्याबाबत दिल्या सूचना
बीड प्रतिनिधी : संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या वास्तव्याने पावण झालेल्या बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र कपिलधारचा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक धनंजय मुंडे, बीडचे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या पुढाकारातून व पाठपुराव्यानुसार कायापालट होणार आहे. येणार्या भाविकांच्या सोयी सुविधा निर्माण करणे व पर्यटनाच्यादृष्टीने सर्वांगीण विकास करण्यासाठी शंभर कोटी रूपयांचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश ग्रामविकास मंत्री हसनजी मुश्रीफ यांनी दिले आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी प्रशासनाला सोबत घेत माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे यांच्या समवेत श्री क्षेत्र कपिलधार देवस्थान परिसराची पाहणी केली. आराखड्यामध्ये कोणती विकास कामे घ्यावयाची आहेत तसेच या संदर्भात आर्कीटेक यांच्याकडून विकास कामाबाबत प्रस्ताव मागवण्या संदर्भातही त्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांना यावेळी सूचना दिल्या. लवकरच शंभर कोटी रूपयाचा विकास आराखडा तयार झाल्यानंतर त्यास ग्रामविकास विभागाकडून अंतिम मंजूरी दिली जाणार आहे.
बुधवार दि. 5 जानेवारी 2022 रोजी आ.संदिप भैय्या क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी श्री क्षेत्र कपिलधार देवस्थानच्या परिसराची पाहणी केली. ही पाहणी करत असतांना कपिलधार देवस्थान ट्रस्टचे विश्वस मंडळी, भाविक व परिसरातील ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती होती. यामध्ये भक्त निवास परिसरात स्वच्छता गृह, दर्शन रागां, सुशोभीकरण, शॉपिंग कॉम्प्लेक्स, कायमस्वरूपी पाणी पुरवठा, शिखर दर्शन, प्रसाद व्यवस्था, मुख्य रस्ता तयार करणे, धबधबा प्रकल्प पाणी पातळी वाढवणे, संरक्षण भिंत, तार कंपाऊंड, बोटींग, पार्कींग व्यवस्था, भोजन कक्ष आदी आवश्यक सुविधेबाबत चर्चा करण्यात आली. प्रसिद्ध अशा आर्कीटेककडून याबाबतचे प्रस्ताव मागून शंभर कोटींच्या विकास कामांचा यात समावेश करून अंतिम मंजूरीसाठी ग्रामविकास विभागाकडे तातडीने पाठवण्या संदर्भात यावेळी सूचना करण्यात आल्या. यावेळी शिवा संघटनेचे प्रा.मनोहर धोंडे, बीड जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता हाळीकर, कपिलधार देवस्थान ट्रस्टचे बाळू मिटकरी, वैजीनाथ नाना तांदळे, बबनराव गवते, नागेश मिटकरी, शिवशंकर भुरे, अशोक शहागडकर, नागेश स्वामी, बाळु स्वामी, किशोर जवळकर, कुंभेश्वर विभुते, परमेश्वर नागरे, सचिन रेकडे, यशवंत शहागडकर, पंचायत समिती सदस्य गुंडीबा जिजा नवले यांच्यासह आदींची उपस्थिती होती.