सेवा यज्ञाने सर्वत्र जयंती साजरी
बीड प्रतिनिधी
स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब बहुजन चळवळीचे प्रनेते होते. आयुष्यभर जनसमान्यांसाठी संघर्ष करुन लोक कल्याणाचे कार्य केले. जात, धर्म, पंत, पक्ष असा कोणताही भेदाभेद न करता सामाजातील उपेक्षीत, वंचीत, बहुजनाचे कैवारी म्हणुन पुढे आले. सामाजीक भान ठेवून दुर्लक्षीत घटकापर्यंत उन्नतीचा मार्ग पोहचवला सातत्याने समाजीतल प्रत्येक घटकांशी संवाद ठेवून त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडली. स्वाभीमानाच मंत्र दिला. कष्टकऱ्यांसाठी नवीन योजना राबवून आधार दिला. सत्तेच्या माध्यमातुन विविध लोकहिताच्या योजना राबवल्या. साहेबांच्या कतृत्व आणि नेतृत्वामुळे राजकीय परीघात बीड जिल्ह्याचे नाव अढळ झाले. जिल्ह्याच्या मुलभुत विकासासाठी साहेबांचे योगदान मोलाचे ठरले. त्यांचे विचार आणि काम गाव खेड्यापासून ते वाडीतोडी पर्यंत पोहचले. कोणताही वारसा नसताना लोक सामर्थ्यांवर उभे केलेले संघर्षमय जीवन भावीपिढीसाठी कायम प्रेरणादायी ठरणार आहे. असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आज बीड शहरातील वार्ड.क्र.3 मध्ये आयोजीत अभिवादन कार्यक्रमात केले.
भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या अवाहानाला प्रतिसाद देत संपुर्ण महाराष्ट्रात सेवा यज्ञाने लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची जयंती साजरी केली जात आहे.
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने भाजपा युवा कार्यकर्ते विलास बामणे यांच्या पूढाकारातुन बीड शरातील वार्ड क्र.3 मध्ये विविध सामाजीक उपक्रमांचे आयोजन करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. कोव्हिड लसीकरण शिबिर, महात्मा फुले जन आरोग्य प्रमाणपत्र वाटप,जातीचे प्रमाणपत्र वाटप, ई-श्रम कार्ड वाटप, मास्क, सँनिटायझर वाटप, राशनकार्ड वाटप व शालेय साहित्य वाटप आदि सामाजीक उपक्रमराबवून जनसेवेच्या मध्यमातुन वाढदिवस साजरा करण्यात आला. 11 व 12 डिसेंबर दोन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भाजपा सरचिटणीस सर्जेरावजी तांदळे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.देविदासजी नागरगोजे, रमेश पोकळे, विक्रांत हजारी, जगदीश गुरखदे, मुरलीधर ढ़ाकने, आजय सवई, संग्राम बांगर, स्वप्निल गलधर, भाजपा राज्य अल्पसंख्याक उपाध्यक्ष सलिमजी जहांगीर, भाजपा शहराध्यक्ष भगिरथजी बियाणी,भाजपा भटके-विमुक्त आघाडी बीड जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मण जाधव, कपील सौदा, नागेश पवार, दत्ता परळकर,सुरेश पवार,ईश्वर धन्वे, सतिश तुसाबंड, रमेश वाघमारे, सुंदर चांदने, नरेश पवार, थापडे सर, शेख अहमद,रतन सोनटक्के, पवन गायकवाड, दिपक घोरपडे, मयूर आदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.