बीड प्रतिनिधी
सोमवार दि.13 डिसेंबर 2021 रोजी देशाचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी काशी विश्वनाथ धाम येथे विविध विकास कामांचे भुमीपुजन व उद्घाटन करणार आहेत. हा कार्यक्रम दिव्य काशी – भव्य काशी या नावाने देश भरात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपुर्ण जिल्ह्यात धार्मिक स्थळावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या भव्य दिव्य ड्रीम प्रोजेक्टचे स्वागत करण्यासाठी 13 डिसेंबर रोजी बीड शहरातील श्री.सोमेश्वर मंदीर बार्शी रोड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.

आज भाजपा राष्ट्रीय सचिव मा. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रम नियोजन संदर्भात संघर्षयोद्धा भाजपा जनसंपर्क कार्यालय नगर रोड बीड येथे भाजपा जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्र मस्केयांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या वेळी नवनाथ शिराळे, ॲड.सर्जेराव तांदळे, चंद्रकांत फड, राजेंद्र बांगर, प्रा.देवीदास नागरगोजे, भारत बप्पा काळे, विक्रांत हजारी, डॉ.लक्ष्मण जाधव, संग्राम बांगर, शांतिनाथ डोरले, हरीष खाडे, प्रमोद रामदासी, कृष्णा तिडके, ॲड.भाग्यश्री ढाकणे, लता राऊत, कपील सौदा, नरेश पवार, विलास बामणे, तुकाराम कागदे, सुरेश माने, शरद बडगे, राजेश चरखा, महेश सावंत, सचिन आगाम, बंडु मस्के, शाम कोटुळे, रविंद्र काळे, बद्रीनाथ जटाळ, सतीश कळसुले, सरपंच गुंदेकर, घोलप मामा, यांच्या सह आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.
काशी विश्वनाथ धाम विश्वात सर्वात प्राचीन व सांस्कृतीक धाम म्हणुन काशी नगरीची ख्याती आहे. करोडो हिंदु जनांची आस्था आणि अढळ श्रद्धा काशी विश्वेश्वरावर आहे. आज वाराणसी स्थीत काशीनगरी प्रचलीत आहे. या धार्मिक धामाचे सौंदर्यीकरण करुन विविध कामांच्या माध्यमातुन परीपूर्ण विकास करण्याची आवश्यकता होती. येथे लाखो भाविकांची येजा असते. येणाऱ्या भाविक भक्तांना मुलभुत सुविधा उपलब्द करुण चारीधाम यात्रा सुसह्य करणे काळाची गरज होती.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून या काशी नगरीचा कायापालट करणारा ड्रीम पोजेक्ट हाती घेऊन अनेक विकास कामांच्या माध्यमातुन नवीन परियोजना सुरु केलेली आहे. या ड्रीम प्रोजेक्ट मधील अनेक कामांचा लोकार्पण व विकास कामांचा भुमीपूजन सोहळा 13 डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यासाठी साधु संत महंत याच्या सह देशातील काही मुख्यमंत्री या भव्य कार्यक्रमात सह भागी होणार आहेत. या भव्य दिव्य सोहळ्याचे थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचे आयोजन देशाभरात केले जानार आहे.
या अनुशंघाने बीड शहरातील श्री.सोमेश्वर मंदीर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सुजान नगरीकांना उपस्थितीत रहावे. असे अवाहन ही राजेंद्र मस्के यांनी केले आहे.