बीड जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभाग फक्त नावालाच; जिल्ह्यात अवैद्य गुटखा विक्री जोरात!
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात गेल्या काही महिन्या पासून गुटखा विक्री मोठया प्रमाणात होत आहे. परराज्यातून पर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा हा बीड जिल्ह्यात येतोय याची सर्व माहिती संबंधित विभागांना असते. परंतु फक्त नावाला पुरत्याच काही कारवाया करायच्या हे सुत्र सध्या बीड जिल्ह्यात सुरु आहे. बुधवारी (ता. 15) पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने बीड तालुक्यातील घोडका राजूरी या ठिकाणी 60 लाखाचा गुटखा जप्त केला ही बाब चांगली आहे. पण यात विशेष म्हणजे पोलीस प्रशासन गुटखा माफियांना दणका देत असताना दुसरी कडे अन्न भेसळ प्रशासन मात्र बघायची भुमिका का घेत आहे? किंवा अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांना त्यांचा त्यांचा हप्ता मिळतो का? यासह इतर प्रश्न जिल्ह्यात उपस्थित होत आहेत.
जिल्ह्यात गुटखा माफिया राज सुरु झाले असून दुसऱ्या राज्यातून मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यात गुटखा येत आहे. ही सर्व वाहतुक वाहनांचे जिल्ह्यात होत आहे. जिल्ह्यातील अनेक भागात गुटखा माफिया सक्रीय झालेले असून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री होत आहे. या सर्व बाबींची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला असते. परंतु ते मात्र याकडे मुद्दाम दुर्लक्ष करतात. यामुळे हा विभाग सध्या फक्त नावाला उरला असल्याचे दिसत आहे. जिल्हाधिकारी साहेब आपल्या कडे गुटखा बंदी असून सुद्धा संबंधित विभागाच्या हलगर्जीपणा जिल्ह्यात गुटखा माफियांना बळ मिळू लागले आहे. यामुळे आता आपणच जिल्ह्यातील गुटखा माफियांना आळा घालू शकतात.
त्या मुळे नावाच्या गुटखा माफियावर कोणते अधिकारी महेरबान!
जिल्ह्यात मुळे नावाचा गुटखा माफिया अनेक दिवसापासून जिल्ह्यात गुटखा विक्री करतोय. यामुळे त्याच्यावर अनेक गुन्हे सुद्धा नोंद करण्यात आलेले आहेत. परंतु तो माफिया कुणालाच का सापडत नाही? मुळे नावाचा एकच माफिया आहे का? त्याच्या मागे अजून कुणाचा हात आहे? याची सखोल तपास कुणी करणार आहे का? बरे त्या मुळे वर अनेक अधिकारी महेरबान का आहेत. यासर्व बाबींचा तपास लावण्याची गरज आहे.