सिरसाळा पोलीस ठाण्यातील प्रकार; उस्मानाबाद येथील एसीबीची कारवाई
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यापासून मोठ्या प्रमाणात लाचखोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यात आज सुद्धा परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह एक खासगी इसमास सहा हजारांची लाच घेताना उस्मानाबाद येथील एसीबी विभागाने रंगेहात पकडले.
सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राखेचे हायवा टिप्पर चालु देण्यासाठी येथील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी नऊ हजारांची मागणी केली होती. यात तडजोडी अंती सहा हजार रुपये देण्याचे ठरले. याची माहिती उस्मानाबाद येथील एसीबी टिमला देण्यात आली होती. या टिमने आज दुपारी सिरसाळा परिसरातील सोनपेठ चौकात सापळा रचून सहा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. या प्रकारणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्ेहा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधिक्षक राहुल खाडे, अपर अधिक्षक मारुती पंडित, उपअधिक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे, पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विष्णु बेळे, विशाल डोके, अर्जुन मारकड, चालक दत्तात्रय करडे यांनी केली.