आज जिल्ह्यात 154 अहवाल पॉझीटिव्ह
बीड । प्रतिनिधी
आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये जिल्ह्यातील सहा तालुक्यामध्ये दहापेक्षाही कमी रुग्ण आढळून आले. यात परळी व पाटोदामध्ये 1 व 2 रुग्ण आढळले, जिल्ह्यामध्ये कोरोनाची संख्या आटोक्यात येत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्हाकरांना दिलासा मिळत आहे.
आज दुपारी आरोग्य विभागाकडून 2217 अहवालचा रिपोर्ट प्राप्त झाला. यात 2063 अहवाल निगेटिव्ह तर 154 अहवाल पॉझीटिव्ह आले. यात अंबाजोगाई-9, आष्टी-59, बीड-14, धारूर-5, गेवराई-11, केज-22, माजलगाव-4, परळी-1, पाटोदा-2, शिरूर-20, वडवणी-7 असे रुग्ण जिल्हाभरात आढळून आले. रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी अजूनही खबरदारी घेत आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.