आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले संकेत
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : काल जालना याठिकाणी आरोग्य मंत्री यांनी कोरोनाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी राज्यात लावण्यात आलेले निर्बंध मे मध्ये सुद्धा वाढवण्यात येतील असे संकेत दिले आहे. यामुळे राज्यात अजुन कडक निर्बंध लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यात काल दिवसभरात 76 हजार कोरोना नव्या रुग्णांची भर पडली. दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे यांचा राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. राज्यात लावण्यात आलेल्या 15 दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये कोरोनाला कशा प्रकारे रोखता येईल याचा सर्व आढावा घेऊनच मे मध्ये नियम शिथील करायचे का? वाढवायचे याचा निर्णय घेण्यात येंणार असल्याचे मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.