कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंञ्यांनी घेतला निर्णय
पंधरा दिवस राज्यात पुर्ण संचारबंदी
उद्या राञी ८ पासून कडक निर्बंध लागु
पंढपुर मध्ये काही शिथिल निर्बंध असतील
येत्या काळात आरोग्य यंञना सक्षम करुत : मुख्यमंञी
मला आपण सहकार्य कराल : मुख्यमंञी
विनाकारण बाहेर फिरता येणार नाही
सकाळी सात ते राञी आठ पर्यंत अत्यावश्क सेवा सुरु
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : राज्यात वाढत असलेली रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्यामुळे मुख्यमंञी यांनी आज (ता.१३) लाॅकडाऊनची घोषणा केली. हे लाॅकडाऊन १५ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत असणार आहे. राज्यातील रुग्ण वाढ भयानक आहे. नविन डाॅक्टरांना विनंती या लढाईत सहभागी व्हा असे आवाहान मुख्यमंञी यांनी केले आहे. आपण सर्व या निर्बंधाचे पालन करुन सहकार्य कराल.
राज्यात गेल्या पंधरा दिवसापासुन मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. यामुळे राज्यातील आरोग्य यंञणा आपुरी पडु लागली आहे. यासह इतर समस्या निर्माण झाल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. यामुळे मुख्यमंञी यांनी राज्यात लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. या लाॅकडाऊन मध्ये सर्व सामान्यांची हेळसांड होणार नाही याची काळजी सरकार घेणार असल्याचे मत मुखमंञी यांनी व्यक्त केले.