गेवराई प्रतिनिधी : गेवराई शहरातील जुना भाग विकासापासून वंचित राहिलेल्या आहे, हे जुने गेवराई शहर असुन शहराच्या वाढत्या गरजेनुसार योजनांची आखणी न केल्यामुळे शहरातील मेन रोड चे वैभव कमी झाले आहे. आम्ही शहराच्या विकासासाठी योजनाबध्द कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे गेवराई शहराला वैभव आणण्यासाठी घड्याळाला मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यिने निवडून द्या असे आवाहन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्षा व नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मेन रोड येथील काॅर्नर बैठकीत बोलत होते.
गेवराई शहरातील नगरपरिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षा व नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ शहरातील मारोती मंदिर जवळ मेन रोडला काॅर्नर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, विरोधकांनी जुन्या गेवराई शहराचा विकास होऊ दिला नाही. बदलत्या काळानुसार काम न केल्यामुळे मेन रोड ची बाजारपेठ ही शहराच्या बाहेर गेली आहे. शहराला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांचा विकास करण्याऐवजी माजी आमदारांनी स्वतः च्या जमिनीचे मार्केट वाढवण्यासाठी फक्त कोल्हेर रोडचा विकास केला आहे. कोल्हेर रोडचे तीन वेळेस डांबरीकरण करुन स्वतः च्या शेतात सिमेंट रोड केला आहे. विरोधक विसरले आहेत की, फक्त कोल्हेर रोड म्हणजे संपूर्ण शहर नव्हे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार शहराच्या विकासाचे व्हिजन घेऊन निवडणूकीला सामोरे जात आहोत. रेणुका मंदिराचे पुनर्जिवन, कल्पेश्वर मळ्यात रस्ते व सभामंडप साठी ६७ लक्ष निधी मंजूर केला आहे. शहरात ओपन जिम व ट्रॅक करायचा आहे. स्टेडियम च्या शेजारच्या जागेवर भाजी मार्केट व जि.प.ची शाळा सुरू करायची आहे. शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे. तो मंजूर झाल्यावर शहराची लोकसंख्या ३० हजार वरुन ५५ हजार होणार आहे. त्याप्रमाणे शहराचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. हे सर्व प्रत्यक्षात साकार करण्यासाठी नगरपरिषद ची सत्ता आपल्या हाती पाहिजे. आपले उमेदवार हे शांत व सज्जन असुन उच्च शिक्षित ही आहेत. यांच्या हाती शहर सुरक्षीत राहील याची खात्री आहे. असा विश्वास अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना रामेश्वर डरफे यांनी शेरोशायरी द्वारे विरोधकांचे वाभाडे काढले. ते म्हणाले की, विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकू लागल्याने ते काहीही बोलत आहेत. दुसऱ्यांना गद्दार म्हणणारे पवारांनी दोनदा आमदार करणाऱ्या पक्षाशी गद्दारी केली. पंडितांना विरोध करुन सत्तेत आले व आता त्याच पंडिता सोबत अभद्र युती केली आहे. गेवराई कर या अभद्र युतीला कधीच स्वीकारणार नाहीत. विकासात राजकारण करणा-यांना आपली जागा दाखवून राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शाहीर राम मुळे यांनी जुन्या आठवणी सांगत बदामराव पंडित यांचा कपटीपणा स्पष्ट केला. ते म्हणाले की, साखर कारखान्याच्या कामासाठी बदामराव पंडित यांची सही आवश्यक होती. तेव्हा संभाजी आण्णा पंडित व मी आठ दिवस मुंबईत राहीलो परंतु बदामराव पंडित यांनी एक सही सुद्धा केली नाही. १९९५ पासुन आम्ही तरुणांनी संघर्ष लढा उभारला परंतु शेवटी निराश व्हावे लागले. ज्या बदामराव पंडित यांच्यासाठी संघर्ष लढा उभारला तेच बदामराव पंडित माझ्या लेकीच्या विरोधात प्रचार करत आहेत. अशावेळी अमरसिंह पंडित यांनी विकासाचे व्हिजन घेऊन दमदार वाटचाल केली. काळाची गरज ओळखून मी माझ्या कित्तेक तरुण मित्रांना साहेबांकडे पाठवून दिले.
या सभेचे सुत्र संचालन श्रीहरी पवार यांनी तर प्रास्ताविक जेष्ठ नेते एस वाय अन्सारी यांनी केले. गणेश सावंत, सुभाष महाराज नागरे, सौ. सिमाताई होंडे, गजानन काळे, संतोष सुतार, शेख खाजा कटूमिया यांनी मनोगत व्यक्त केले. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी व मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
![]()
















