सरपंच परिषदेच्या सदैव संघर्षशील भूमिकेमुळेच ग्राम समृद्धी- सभापती प्रा. राम शिंदे
सरपंचाचा प्रतिनिधी विधान परिषदेत असावा..
— आ.सुरेश धस
आष्टी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची मुदत 45 दिवसांनी वाढवली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वाकांक्षी योजना असून ग्रामविकासासाठी अत्यंत उपयुक्त असणारी ही योजना यशस्वी करण्यासाठी सरपंचांनी मोठी भूमिका बजावावी.. केवळ शासकीय अधिकाऱ्यांवर अवलंबून न राहता सरपंचांनी ग्रामस्थांना बरोबर घेऊन ही योजना राबवल्यास महाराष्ट्रातील सर्व गावे ग्राम समृद्ध होतील असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले तर सरपंच संघटना ही सदैव संघर्ष शील आणि ग्रामीण भागाच्या समस्या निवडण्यासाठी तत्पर असल्यामुळे ही अत्यंत संघटन ही अत्यंत कठीण बाब असूनही सरपंच परिषद दत्ता काकडे यांचे नेतृत्वाखाली समर्थपणे काम करत आहे त्यांनी शिवतीर्थ या निवासस्थानात गृहप्रवेश छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान संवाद मिळावा आयोजित करून त्रिवेणी संगम साधला आहे असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी केले तर सरपंच हा ग्रामीण विकासाचा कणा असून शिक्षक पदवीधर स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा सदस्यातून देखील विधान परिषद सदस्य निवडले जातात त्याचप्रमाणे राज्यातील सर्व सरपंचांमधून एक आमदार निवडला जावा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आष्टी येथील सरपंच पदी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष पत्रकार दत्ताभाऊ काकडे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानामध्ये गृहप्रवेश तसेच हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण सोहळा आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आणि समन्वयक दैनिक लोकप्रभाचे संपादक संतोष मानूरकर, सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी माजी आमदार भीमराव धोंडे, यशदाचे उपमहासंचालक डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी हे उपस्थित होते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू केले आहे गावातील अंतिम घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे लोकसहभाग वाढवणे आणि ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा करणे हे मुख्य उद्दिष्ट असून आर्थिक वर्ष 20-25 26 साठी या उपक्रमाची रूपरेषा तयार करण्यात आली आहे या अभियानामध्ये सात प्रमुख घटक निश्चित करण्यात आले असून सुशासनयुक्त पंचायत सक्षम पंचायत आणि जलसमृद्ध स्वच्छ व हरित गावे मनरेगा आणि इतर योजनांचे अभिसरण गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय लोकसहभाग आणि श्रमदान माध्यमातून लोक चळवळ निर्माण व्हावी या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले दत्ताभाऊ काकडे यांच्या नेतृत्वाखालील सरपंच परिषदेच्या सर्व मागण्या या सकारात्मक असतात त्यामुळे ग्रामविकासासाठी अखंड परिश्रम घेणाऱ्या या संघटनेचे महाराष्ट्रातील ग्राम विकासामध्ये मोठे योगदान ठरणार आहे सरपंचांनी देखील हेच पंचायतराज अभियान यशस्वी करावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले प्राध्यापक राम शिंदे पुढे बोलताना म्हणाले की सरपंच संघटन हे अत्यंत अवघड असून सतत सदैव संघर्षशील भूमिका त्यांना बजावावी लागते दत्ता काकडे यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक सरपंच परिषदेचा कार्यविस्तार वाढवला असून सरपंचांना सन्मान देण्याचे काम केले आहे लवकरच जनगणनेचे काम सुरू होणार असून लोकसभा मतदार संघाच्या जागा वाढणार आहेत त्यामुळे सर्व मतदारसंघांच्या रचना बदलणार असून विधान परिषदेच्या देखील जागा वाढू शकतात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कमिटीने वन नेशन वन इलेक्शन यावरही काम केले असून या सर्व बदलानंतर विधान परिषदेच्या जागा वाढतील त्यामध्ये राज्यातील सरपंचांमधून एक आमदार असावा असाही प्रयत्न करण्यात येईल सरपंच परिषद आणि मुख्यमंत्र्यांचे निकटचे विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांच्या माध्यमातून सरपंच परिषदेने जोर लावल्यास हे काम शक्य होणार आहे असे सांगत त्यांनी सरपंचांचे मानधन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवण्याचे मोठे काम सरपंच परिषदेने केले आहे त्यामुळे सरपंच परिषद अधिक मजबूत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली अध्यक्षीय समारंभामध्ये आमदार सुरेश धस यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यपद्धती विषयी गौरव उद्गार काढून सतत ग्राम विकासाबाबत अत्यंत सकारात्मक असणारे मंत्री आहेत त्यामुळेच सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा स्ट्राइक रेट वाढतो आहे असे सांगितले यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की हे राजकीय व्यासपीठ नाही नुकत्याच झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई बाबत शासनाने समाधानकारक काम केले असून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे अत्यंत चांगले काम चालू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी बोलताना विधान परिषद सदस्य आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले की 2014 पासून 2025 पर्यंत या कालावधीमध्ये ग्राम पंचायत स्तरावरील कामे आणि सरपंचांच्या मागण्या ग्राम विकासासाठी आवश्यक असलेल्या योजना राबवणे याबाबत दत्ताभाऊ काकडे यांनी अतिशय मोठे काम केले आहे अत्यंत चिकाटी कार्यक्षमतेने त्यांनी हे काम केल्यामुळे सरपंच परिषदेचे काम अत्यंत उंचावले आहे दत्ता काकडे यांच्या सर्व सकारात्मक मागण्यांबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत असतो दत्ता काकडे यांचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत त्यांच्या स्नेहमय धाका मुळे मी या कार्यक्रमास आलो आहे असे सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी केले शिवतीर्थ या निवासस्थानाचा गृहप्रवेश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान संवाद मेळावा या सर्व कार्यक्रमांचे बहारदार सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक निलेश दिवटे आणि आष्टीचे प्रसिद्ध निवेदक बाळासाहेब तळेकर यांनी केले या कार्यक्रमास बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक अध्यक्ष सतीश शिंदे सभापती बद्रीनाथ जगताप युवराज पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख आदिनाथ सानप अण्णासाहेब चौधरी गौतम आजबे परिवंत गायकवाड पंडित पोकळे सुवर्णा लांबरुड किशोर हंबर्डे भाऊसाहेब लटपटे सुनील नाथ सतीश धस बबन डोके भीमराव बोडके सुधीर पठाडे दादा पांडुळे प्रतिभा थोरवे, गंगाधर आजबे














