आम्हाला कृपया लसींचा पुरवठा करा : सुप्रिया सुळेंची केंद्राला विनंती
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, त्यात पुण्यात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. लस उपलब्ध नसल्यामुळे पुण्यातील १०९ लसीकरण केंद्र बंद पडले आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली. केंद्राने राज्याला जास्त लस पुरवठा करावा अशीही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय आरोग्य मंञी डाॅ.हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.