_”या कोण कोण येतय या……! लोक म्हणतात नुरा कुस्ती पण आपण नुरा कुस्ती खेळत नसतो , मी हाबुक ठोकून मैदानात !”_
_माझ्या भावाला भरभरून आशीर्वाद द्या; पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही- पंकजा मुंडे यांची ग्वाही_
परळी वैजनाथ, प्रतिनिधी….दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्यापासून ते आमच्यापर्यंत आम्ही इमाने इतबारी जनतेची सेवा केली आहे. इमानदारीने जातपात धर्म पंथ या पलिकडे जाऊन जनतेची सेवा एक व्रत म्हणून केलेलं आहे. मी असो की पंकजाताई असो आम्ही प्रत्येकाच्या सुख दुःखात अखंडपणे काम करत आहोत. मात्र निवडणूका आल्या की काही लोकांना आपल्या भागातील लोकांच्या सेवेत असलेली नेतृत्व डोळ्यात खुपतात. राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला जातो.मात्र परळीच्या जनतेचा आमच्यावर व आमचा परळीच्या जनतेवर श्रद्धा, विश्वास आहे. सध्या लोक म्हणतात समोरच्या उमेदवाराशी आपली नुरा कुस्ती आहे.मात्र आपण नुरा कुस्ती खेळत नसतो , मी हाबुक ठोकून मैदानात आहे,या कोण कोण येतय या.. अशी हाबुक ठोकत धनंजय मुंडेंनी विरोधकांना ललकारले.
परळी वैजनाथ मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ आज परळीतील ऐतिहासिक गणेशपारची पारंपारिक जाहीर सभा झाली.दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यापासून सर्व निवडणुकांमध्ये ऐतिहासिक गणेशपारची पारंपारिक जाहीर सभा घेण्यात येते.ही सभा एकप्रकारे विजयाचा शुभसूचक अशी सभा समजली जाते.धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ झालेली आजची सभा धनंजय मुंडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी सभा ठरली.या सभेला भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे,माजी खासदार डॉ.प्रितमताई मुंडेंसह परळी शहरातील महायुतीचे सर्व पदाधिकारी,परळीतील जेष्ठ प्रतिष्ठीत नागरीक, गावभागातील सर्व समाजघटकातील प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जनसेवेचे काम करत आहोत अखंड सेवा धर्म स्वीकारून आमच्या परिवाराने कासार काम केले आहे राज्यात मी अनेक ठिकाणी सभा घेतल्या राज्यात कोणत्याही मतदारसंघात गोपीनाथराव मुंडे यांचे दहा पंधरा वेळा नाव घेतल्याशिवाय कोणतीच सभा होत नाही असा समृद्ध वारसा आपल्या परळी मतदारसंघाला लाभलेला आहे मी व धनु भाऊ अखंडपणे तुमच्या सेवेत आहोत राहणार आहोत यावेळी आम्ही एकत्र असून एक दिलाने काम करत आहोत आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहत आले आहेत यावेळी तर आम्ही एकत्र येऊन आपल्याला आशीर्वाद मागत आहोत हे आशीर्वाद आमच्या पाठीशी तुम्ही नक्कीच उभे करणार आहात याची मला खात्री आहे माझ्या भावाला यावेळी आशीर्वाद द्या तुम्हाला पश्चातापाची वेळ येऊ दिली जाणार नाही अशी ग्वाही पंकजाताई मुंडे यांनी यावेळी दिली.
● *निवडणूका येतील जातील पण जे राजकारण खेळलं गेलं हे चीड आणणारं – धनंजय मुंडे*
———————–
दरम्यान यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षापासून आपण इमाने इतबारे जाती धर्म पंथ या पलीकडे जाऊन 18 पगड जाती धर्माशी एका कुटुंब सदस्य प्रमाणे काम करत आलो आहोत. मात्र परळीतील हे सामाजिक सौहार्द या निवडणुकीचे निमित्त करून बिघडवण्याचा प्रयत्न बाहेरच्या काही लोकांनी सुरू केला आहे. निवडणुका येतील जातील मात्र माझ्या परळीतील असलेली हे सामंजस्य व सर्व जाती धर्मातील एकोप्याची घडी बिघडवण्याचं काम चिड आणणारे आहे. या निवडणुकीतच नाही तर कोणतीच निवडणुक आपण कधीच हलक्यात घेतलेली नाही. निवडणुका निबडणुकीच्या पद्धतीने खेळल्या जातील. त्यासाठी आपण सदैव तयारच आहोत. मात्र यावेळी जाणिवपूर्वक इथे जाती-जातीमध्ये विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न मुद्दामून केला गेला आहे. या ठिकाणची सामाजिक एकोप्याची भावना व या ठिकाणची 18 पगड जाती धर्माची जीवनाची अतिशय चांगली चाललेली घडी विस्कटून टाकण्यासाठीचा आघोरी व विषारी प्रयत्न केला गेला. हे काही बरे नाही. याची आपल्याला प्रचंड चिड येते. आपल्या परळीची ही सामाजिक एकजूट, एकता यावरच घाला घालण्याचा हा दुष्ट प्रयत्न आहे.मात्र याला कोणीही बळी न पडता आपल्यातील सर्व जाती धर्माच्या एकोप्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा डाव यावेळी मला आशीर्वाद देऊन उधळून टाका असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.