गेवराईत मराठा समाजासाठी जनसेवा कार्यालयाचे जरांगे पाटलांच्या हस्ते उदघाटन संपन्न
गेवराई/ अनिल आगुंडे : मराठ्यांनी संभ्रमात राहू नका ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडून टाका आता वाट बघू नका काय करायचं ते तुम्हाला चांगलं माहीत आहे. गेवराईच्या समाजाला सांगतो लिहून घेणं किचकट प्रक्रिया आहे त्यामुळे या भानगडीत पडू नका. एकजूट करून आपल्या आरक्षणाला विरोध करणाऱ्याला पाडून टाका असा आदेश मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिला आहे.
गेवराई येथे आज मराठा सेवक महेश दाभाडे यांच्या जनसेवा कार्यालयाचे उदघाटन मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की,
मराठा समाज खूप हुशार आहे. नुसतं पाडा म्हटलं तरी पाडतेत, यावर सरकारने संशोधन सुरू केलंय.
इलेक्शन हे 15 दिवसाचे मनोरंजन आहे. माझा समाज अडचणीत येऊ नये, समाजात दुफळी निर्माण होऊ नये, माझ्या समाजाचे मला वाटोळे करायचे नव्हते म्हणून मी या निवडणुकीतुन माघार घेतली त्यात गैर काय, माझा मराठा समाज सगळ्या जातीधर्माचा आदर करतोय.
आता मराठा समाजाने आपल्या तालुक्यातील निवडून येणाऱ्या उमेदवाराला मतदान करून ताकदीने पडापाडी करा असे स्पष्ट सांगितले. समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हा आपला मुख्य हेतू आहे. एकदा निवडणूक होऊ द्या, आपण कसे आरक्षण घ्यायचं ते मी बघतो. आता मी पुढच्या आंदोलनाची तयारी करतोय आपलं आंदोलन कायम चालू राहील. कुणाकडून लिहून न घेता पाडापाडीवर जोर ठेवा. एकजुटीने अन ताकदीने मतदान करा. तुम्ही बरोबर करणार हे मला माहित आहे. त्यामुळे पाडा पाडीचा सन्मान करा. कोणाच्या सभेला अन प्रचाराला जाऊ नका असे आवाहन संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना केले.
जनसेवा कार्यालय उदघाटन करून महेश अण्णांनी समाजासाठी हक्काची जागा दिली – मनोज जरांगे पाटील
गेवराईत गोरगरीब मराठा समाजाला आधाराची गरज होती. ती गरज आता या जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून समाजाच्या कामी येईल, कुठल्याही अडचणीत त्यांना मदत मिळवण्यासाठी हे कार्यालय समाजाच्या उपयोगी पडेल, हे कार्यालय उघडून महेश अण्णांनी हक्काची समाजाला हक्काची जागा दिली असल्याचे प्रतिपादन संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी केले. गेवराई शहरात आता आपल्या समाजासाठी ही हक्काची जागा झाली.