अँड. अजित देशमुख यांची मागणी
प्रारंभ वृत्तसेवा
बीड ( प्रतिनिधी ) सध्या कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. प्रशासन पातळीवर योग्य निर्णय घेतली जात असले, तरी त्याची अंमल बजावणी होत नाही. एकीकडे पेशंटची संख्या दिवसें दिवस मोठया प्रमाणात वाढत चालली असताना दुसरीकडे विना मास्क फिरणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. हे लोक दुसऱ्याला अडचणीत आणतील. त्यामुळे रस्त्यावर विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे या लोकांवर गुन्हे दाखल करून जास्तीत जास्त दंड वसूल करण्याची मोहीम जिल्हा भरातून सातत्याने राबविणे आवश्यक असल्याचे मत जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
बीड जिल्ह्यात प्रशासन पातळीवर योग्य निर्णय घेतले जात असून यामुळेच आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या कमी राहिली आहे. मात्र एकीकडे प्रशासन चांगलं काम करत असताना दुसरीकडे नागरिक मात्र विना मास्क आणि मोकाट फिरताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी विक्रेते देखील मास्क वापरताना दिसत नाहीत. सामान्य जनता काळजी घेत असताना दुसरीकडे निष्काळजीपणाने फिरणारे लोक सामान्य जनतेला वेठीस धरत आहेत. यामुळे जनजीवन अशा लोकांमुळे दहशती खाली आहे.
या काळामध्ये लागू असलेल्या सर्व तरतुदी पाळणे आणि कायदा पाळणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. एक नागरिक अनेक नागरिकांना दबावाखाली खाली ठेवत असेल तर ही बाब चुकीची आहे.
त्यामुळे अशा लोकांना मास्क वापर म्हणून थेट सांगणे आवश्यक आहे. मास्क वापरला जात नसेल तर ते चुकीचे असल्याने अशा लोकांपासून जनतेने दूर रहावे. स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे या काळामध्ये जो कोणी विना मास्क व्यापार करीत असेल अथवा रस्त्याने फिरत असेल, अशा सर्वांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात यावी. प्रसंगी फौजदारी गुन्हे देखील दाखल करण्यात यावेत, असे अँड अजित देशमुख यांनी म्हटले आहे.