सक्तीची विज बिल वसुली थांबवा…
बीड (प्रतिनिधी) दि.३१ मागील वर्षापासुन कोरोना या संसर्ग जन्य रोगाने थैमान घातले आहे. या संसर्गामुळे अनेक उद्योग व्यवसाय तसेच हातावर पोट भरणा-या नागरिकांनासह गोर गरिब जनतेचे आर्थिक नुकसान झाले आहे. आपली उपजिविका भागविणे सध्या कठीण झाले असुन अशा गंभीर परिस्थिती मध्ये शासनाने विज बिल माफीची घोषणी केली होती.मात्र विज बिल माफ करण्याऐवजी विद्युत महामंडाळ हे खाजगी सावकार पध्दतीने चक्रवाढ पध्दतीच्या व्याज दराने सक्तीची विज बिल वसुली करीत आहे. ती सक्तीची वीज बिल वसुली थांबवा असे बहुजन समाज पार्टीचे मराठवाडा झोनचे प्रभारी प्रशांत वासनिक यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.
विद्युत महामंडाळाकडुन ग्राहाकाने कर्ज घेतले नसुन विद्युत महामंडळ कर्जाची सक्तीने व्याज वसुली करित आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांने पोट भरायचे का,विजमहामंडाळाचे कर्ज भरायचे? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
एकीकडे शासन लॉकडाऊनच्या नावाखाली व्यावसायिकांना व नागरिकांना घरात बंदिस्त करत आहे व दुसरीकडे सक्तीने विज बिल वसुली करित आहे. आणि विज बिल न भरल्यास विज कनेक्शन तोडण्याच्या धमक्या देत आहेत. जनतेला आज कुटुंब संभाळणे व त्यांचे पोट भरणे कठीण झाले असुन अशा परिस्थीतीत विज बिल कसे भरायचे ? शासन प्रशासनाला सगळीकडे अंधारंच करायचा आहे का? असा प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे मा. पोलीस अधिक्षक साहेबांनी खाजगी सावकाराप्रमाणे विज बिलावर चक्रवाढ पध्दतीने व्याज आकारना-या विद्युत महामंडळावर खाजगी सावकारकीचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा बहुजन समाज पार्टी मराठवाडा झोन प्रभारी प्रशांत वासनिक च्या वतीने मोठ्या प्रमाणात अंदोलन करणार आहेत.