बीड प्रतिनिधी : येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑपरेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड शिवाजीनगर शाखेत सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक विनोद सदाशिवराव धांडे यांनी संपूर्ण विश्वास व्यक्त करीत सोमवारी ५ लाखांची एफ.डी. केली आहे. ज्ञानराधा बँकेवर खातेधारकांनी पूर्वीचा विश्वास कायम ठेवण्याचे आवाहन विनोद धांडे यांनी केले आहे.
ज्ञानराधा बँक आर्थिक अडचणीत सापडल्याची गावात सर्वत्र अफवा पसरल्यामुळे ठेवीदारांमध्ये गैरसमज निर्माण झाला होता.मात्र सामाजिक कार्यकर्ते विनोद धांडे ज्ञानराधा बँकेवर विश्वास दाखवला आहे. तसेच ज्ञानराधा बँक आपल्या बीड जिल्ह्याची शान आहे हजारो कुटुंबांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लागलेला आहे असे असताना कोणी चुकीच्या अफवा पसरवल्या म्हणून आपण आपल्या बँकेवर अविश्वास दाखवून योग्य नसल्याचे सांगत सर्व ग्राहकांनी कोणतीही शंक उपस्थित न करता आफवांना बळी पडू नये असे आवाहन केले. यावेळी ज्ञानराधाचे चेअरमन सुरेश ज्ञानोबाराव कुटे, शाखा व्यवस्थापक घोडके उपस्थित होते.