आ.संदीप क्षीरसागरांची मुख्यमंत्री, महसूल प्रशासनाकडे मागणी
बीड प्रतिनिधी :- ३० सप्टेंबर रोजी महसूल विभागाने बीड जिल्ह्याची हंगामी पैसेवारी ४८ पैसे जाहीर केली आहे. बीड जिल्ह्यात टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा. अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अंतर्गत च्या पैसेवारी काढण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आल्यास तो भाग दुष्काळी जाहीर करण्याचे स्पष्ट नमूद आहे. यापूर्वीही बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी वारंवार पाठपुरावा केलेला आहे. त्यानंतर आता ३० सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्याची पैसेवारी महसूल विभागाने जाहीर केली आहे. यात बीड जिल्ह्याची पैसेवारी ४८ पैसे आली असून जिल्हाभरात टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या, यासाठी आ.क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री, विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.