बीड विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचा भगवा झंझावात
गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक अभियान जोरात
जिल्हाप्रमुख खांडे हस्ते खालापुरीत शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन
बीड प्रतिनिधी : ग्रामीण भागात शिवसेनेला अधिक मजबुत करण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागण्याची गरज आहे. शहरी भागात तर शिवसेना सर्वात जास्त मजबूत पक्ष आहे. ग्रामीण भागातील जनता सुध्दा शिवसेनेसोबतच आहे. परंतु पक्षाला अधिक ताकद येण्यासाठी शिवसैनिकांनी गावपातळीवर सक्रिय होऊन संघटन वाढवावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केले. गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्हाप्रमुख खांडे यांच्या हस्ते रविवारी तालूक्यातील खालापुरी येथे शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन संपन्न झाले.बीड विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचा भगवा झंझावात असाच कायम राहिल. येणार्या काळात आपल्याला बीड विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकावयाचा आहे त्यासाठी शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे असे आवाहन जिल्हाप्रमुख खांडे यांनी केले.तसेच खालापुरी येथे लवकरच 20 लक्ष रु.च्या विकास कामांचा शुभारंभ होणार असल्याचेही खांडे यांनी सांगितले.
बीड तालूक्यातील खालापुरी येथे रविवारी शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन जिल्हा प्रमुख खांडे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी परमेश्वर नाना तळेकर, उपजिल्हाप्रमुख गणेश उगले, उपजिल्हाप्रमुख भरत भाऊ जाधव, शहर प्रमुख कल्याण नाना कवचट, बीड तालुका प्रमुख संतोष नाना घुमरे, शिरूर कासार तालुकाप्रमुख सुनील दादा सोनवणे, सखाराम सालपे, तुकाराम धनगुडे, बाजीराव थोरवे, साईनाथ मिसाळ, शरद ढाकणे, गणेश सानप, महादेव सोनवणे, अंबादास सोनवणे, संदीप सोनवणे, शिव नागरगोजे, सोमीनाथ गीते, बाबू धांडे, विष्णू बडे,पंडित परजणे, आदिनाथ परजणे सर, राजेंद्र सोनवणे लक्ष्मण,महादेव सोनवणे, चेअरमन गोकुळ सोनवणे, शहादेव सोनवणे, प्रल्हाद परजणे, लक्ष्मण तात्या परजणे, संतोष दराडे, संजय उगले, सोमीनाथ सानप, सुदाम उगले, कल्याण उगले, बबन देशमुख, हनुमान परजणे तसेच गावातील बहुसंख्य शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.
उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना जिल्हाप्रमुख खांडे म्हणाले की, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या अनेक योजना आणल्या आहेत. शिवसैनिकांनी त्या योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी कार्य करावे. खालापुरी ग्रामस्थांना माझे आवाहन आहे की तुमचे शासकिय, प्रशासकिय, वैयक्तीक कोणत्याही स्वरुपाचे काम आम्ही मार्गी लावण्यासाठी कटिबध्द आहोत. शिवसेना शाखेच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तुमची कामे करुन आम्हाला तुमचे मन जिंकायचे आहे.ज्या प्रमाणे मोदी सरकार शेतकर्यांना 6 हजार रु.अनुदान देत आहेत तशाच प्रकारे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सुध्दा शेतकर्यांना 6 हजार रु.अनुदान जाहिर केले आहे. महिलांना एस.टी.प्रवासात 50 टक्के सुट दिली आहे. श्रावण बाळ योजनेच्या अनुदानामध्ये 500 रु.ची वाढ केली आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात सुध्दा वाढ केली आहे. शिंदे साहेबांच्या माध्यमातून लवकरच खालापुरी येथे 20 लक्ष रु.च्या विकास कामांचा शुभारंभ होईल असे खांडे म्हणाले. ग्रामीण भागाचा विकास हा फक्त शिवसेनाच करु शकते. त्यामुळे तुम्ही साथ द्या. बीड विधानसभेवर आपल्याला शिवसेनेचा भगवा फडकावयाचा आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे असे आवाहन जिल्हाप्रमुख खांडे यांनी केले. शाखा उद्घाटन कार्यक्रमाला खालापुरी ग्रामस्थांची मोठी गर्दी दिसून आली.