• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, May 2, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

नगरपालिका हद्दीतील ‘त्या ‘ 72 कामांची प्रशाकीय मान्यता रद्द

Prarambh Team by Prarambh Team
April 26, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

अमर नाईकवाडे यांच्या हस्तक्षेप अर्जावर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

बीड  प्रतिनिधी  : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून बीड नगरपालिका हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत ) यांच्यामार्फत पाच (5) कोटी रुपयांचे एलईडी दिवे बसवून घेण्याच्या 72 कामांची प्रशासकीय मान्यता अखेर रद्द करण्यात आली आहे. नागरपालिकेने सदर कामे बाह्य यंत्रणेकडून करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत नाहरकत रद्द केलेली असतानाही सदर कामे करून घेण्याचा घाट आ. संदीप क्षीरसागर यांनी घातला होता. त्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने धक्का बसला आहे. यात अमर नाईकवाडे यांनी अभ्यासपूर्ण बाजू मांडत सदर कामे करणे चुकीचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून 186 एलईडी बसवण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. यातील पालिका हद्दीतील 72 कामांना आमदार संदीप क्षीरसागर यांच्या शिफारसीने सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत ) उस्मानाबाद यांच्यामार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली, मात्र कार्यारंभ आदेश देण्यात आले नव्हते. बीड नगरपालिका हद्दीतील ही कामे बाह्य यंत्रणेमाफर्त करण्यासाठी आ. संदीप क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला होता. दरम्यान कार्यारंभ आदेश न मिळाल्याने संबंधित कंत्राटदाराने मा. उच्च न्यायालयात धाव घेतली होती, त्यावर न्यायालयाने यात जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.
जिल्हाधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीत अमर नाईकवाडे यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल करून सदर कामांना बीड नगर पालिकेने दिलेली नाहरकत रद्द करण्यात आलेली आहे. तसेच यातील अनेक कामे नगरपालिकेने यापूर्वीच केली आहेत, सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत ) उस्मानाबाद यांनी जे अंतर दाखविले आहे ते देखील चुकीचे आहे, दोन पोल मधील अंतर काही ठिकाणी 2 मीटर देखील नाही, मग अशाठिकाणी १८ पोल कसे बसणार ? यासह अनेक मुद्दे मांडून सदर प्रशासकीय मान्यता रद्द करण्याची मागणी केली होती.
सदरील प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान मा. जिल्हाधिकारी, बीड यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग उस्मानाबादचे श्री बनसुडे यांना अंदाजपत्रकात नमूद एका कामासाठी 18 पोल नेमके किती अंतरावर बसवणार आहेत असे विचारले असता 25 मीटर अंतरावर एक पोल बसवण्यात येणार असल्याचे श्री बनसोडे यांनी मा. जिल्हाधिकारी बीड यांना सांगितले. त्यानंतर मा. जिल्हाधिकारी, बीड यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांना कामांचा स्थळ पाहणी अहवाल तयार करून तो सादर करण्याचे आदेशित केले होते. बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी स्थळ पाहणी अहवाल दाखल केला. वार्ड क्रमांक 4 मधील हिरामण गायकवाड ते कांबळे यांच्या घरापर्यंत पोलसहित एलईडी लाईट बसवणे या कामात 25 मीटर अंतरात 18 पोल उभे करण्यात येणार आहेत, वाॅर्ड क्रमांक 13 मारुती वाघ ते रजनीकांत उगले यांच्या घरापर्यंत 23 मीटर मध्ये 18 पोल, वार्ड क्रमांक 3 मधील वसंत कुलकर्णी ते परळकर यांच्या घरापर्यंत 35 मीटर मध्ये 18 पोल, वाॅर्ड क्रमांक 2 मधील बहिरबाई यांचे घर ते प्रभाकर जोगदंड यांच्या घरापर्यंत 48 मीटर मध्ये 18 पोल उभे करण्यात येणार असल्याचे आढळून आले. नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी पूर्ण अहवाल तपासला असता एका कामाचे 50 मीटर पेक्षा कमी आंतर असलेले 12 कामे आढळून आली. एका कामाचे 100 मीटर पेक्षा कमी अंतर असलेले 34 कामे आढळून आली. श्री बनसुडे यांनी सुनावणी दरम्यान मा. जिल्हाधिकारी, बीड यांना सांगितलेल्या 2 पोल मधील 25 मीटरच्या अंतराप्रमाणे गृहीत धरले असता एका कामातील अठरा पोल हे किमान 400 ते 450 मीटर अंतरात बसवणे अपेक्षित आहे. 400 मीटर अंतर एकही कामात आढळून आले नाही.
यासोबतच मुख्याधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी अहवालात अक्षांश रेखांश आराखडे जोडलेले आहेत. त्यात देखील अजब प्रकार समोर आला श्री बनसुडे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग, उस्मानाबाद यांनी अंदाजपत्रकाला जे फोटो जोडलेले आहेत ते आणि मुख्याधिकाऱ्यांच्या स्थळ पाहणीतील फोटो पूर्णपणे वेगळे आहेत. सदरील तीनही फोटो अमर नाईकवाडे यांच्या प्रभागातील असल्याकारणाने त्यांना ते पटकन लक्षात आले. याचाच अर्थ या संपूर्ण कामांमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने बोगसगिरी करण्यात आलेली आहे. ही सरळ सरळ शासनाची फसवणूक आहे, हे नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी सुनावणी दरम्यान पुराव्यानिशी सिद्ध केले.
तसेच या प्रकरणात आ. संदीप क्षीरसागर यांनी केलेल्या हस्तक्षेपावर देखील आक्षेप घेतले होते.
याची सुनावणी झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय राखून ठेवला होता. आता जिल्हाधिकाऱ्यांनी कंत्राटदाराचा अर्ज नामंजूर केला असून त्या ७२ कामांच्या प्रशासकीय मान्यता रद्द केल्या आहेत. आ. संदीप क्षीरसागर यांना हा मोठा धक्का आहे.

Previous Post

MPDA कायद्याअंतर्गत एका गुंडाची हर्सुल कारागृहात रवानगी

Next Post

मतदारच माझा राजकीय पक्ष-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
Next Post
मतदारच माझा राजकीय पक्ष-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

मतदारच माझा राजकीय पक्ष-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड शहरातील भगवान बाबा स्मशानभुमीच्या जागेवर अतिक्रमण

बीड शहरातील भगवान बाबा स्मशानभुमीच्या जागेवर अतिक्रमण

या राष्ट्रवादी आमदाराच्या पीएने पोलीस कर्मचार्याला केली शिवीगाळ!

या राष्ट्रवादी आमदाराच्या पीएने पोलीस कर्मचार्याला केली शिवीगाळ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा