◆ सुरेश प्रभू, सतिष मराठे यांचीही झाली भाषणं ◆
– अँड. अजित देशमुख
शिर्डी ( प्रतिनिधी ) सहकारी संस्थांनी सर्वांगीण विकासात मोठ्या प्रमाणात हातभार लावला. मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या नावाने केंद्र सरकारच्या कायद्याप्रमाणे या पतसंस्था अस्तित्वात आल्या. राज्यातील सहकारी पतपुरवठा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून त्यांनी नावलौकिक मिळाला. विश्वस्त म्हणून हजारो कोटी रुपयांच्या ठेवी आपण सांभाळत आहात. त्यामुळे ग्राहकांना सावरण्यासाठी आपण सदैव सज्ज रहावे, असे मत अरबीट्रेटर अँड. अजित एम. देशमुख यांनी व्यक्त केले.
फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ने राज्यातील सर्व मल्टीस्टेट सोसायटी यांच्या चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अधिवेशन शिर्डी येथे दिनांक १२ आणि १३ जानेवारी रोजी आयोजित केले होते. यावेळी अँड. अजित देशमुख यांनी अधिवेशनातील उपस्थित मान्यवरांना पाऊन तास मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे या अधिवेशनास माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, रिझर्व बँक ऑफ इंडियाची संचालक सतीश मराठे, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, मल्टीस्टेट संस्थांच्या फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना अँड. अजित देशमुख म्हणाले की, समाजाच्या जडणघडणीमध्ये सहकाराने मोठा वाटा उचललेला आहे. महाराष्ट्रातील आणि केंद्रातील सहकारी संस्थांबाबतचे कायदे अस्तित्वात येण्यापूर्वी पासून सहकार चळवळ चालू होती. ही चळवळ जोपासण्याचे काम मोठ्या प्रमाणात झालेले आहे. आजही सहकारी संस्थांवर जनतेचा प्रचंड विश्वास आहे.
बहुराज्जीय सहकारी संस्था अधिनियम त्याचप्रमाणे लवाद आणि समेट अधिनियम यासारख्या महत्वाच्या कायद्यातील अनेक तरतुदींवर देखील यानीं देशमुख यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपरोक्त मान्यवरांसह राज्यभरातील अनेक संस्थांचे पदाधिकारी त्याचप्रमाणे संचालक उपस्थित होते. राज्यातील अनेक संस्थांना सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून पुरस्काराने गौरवण्यात आले.