दोन जणांवर परळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
पोलीस उपअधिक्षक शंकर शिंदे यांच्या टिमची कारवाई
प्रारंभ न्युज
बीड : राख वाहतुकीसाठी लागणारे गेट पास देण्यासाठी परळी येथील उपकार्यकारी अभियंता यांनी चक्क 80 हजार रुपयांची मागणी केली होती ही रक्कम एका खाजगी इसम कडे देण्याची सांगितले असता खाजगी इसम ही रक्कम स्वीकारत असताना सोमवारी (ता. २६) एसीबीने या व्यक्तीस रंगात पकडले या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात उपकार्यकारी अभियंता व खाजगी इसमावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या टीमने ही कारवाई केली
थर्मल केंद्र ,परळी येथील राख वाहतुकीसाठी 20 गेटपास देण्यासाठी श्री अनिल रामदास वाघ (वय 36 वर्ष उप कार्यकारी अभियंता,परळी थर्मल पॉवर स्टेशन म.रा.वि.नि.कंपनी मर्यादित) यांनी तक्रारदार यांना प्रत्येकी गेटपास 4000 रू प्रमाणे एकुण 80,000 रू लाचेची मागणी केली होती. याअनुषंगाने एसीबीने सापळा रचला होता. खासगी इसम आदिनाथ आश्रुबा खाडे, ( वय 36 वर्ष रा.शिवाजी नगर,परळी जि.बीड (खाजगी इसम)) यांना ८० हजाराची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. हि कारवाई पोलीस अधिक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक शंकर शिंदे यांच्या टिमने केली. श्री.रविंद्र परदेशी,पोलीस निरीक्षक, पो.नि अमोल धस,पोलीस अंमलदार श्रीराम गिराम,अमोल खरसाडे,भारत गारदे,अविनाश गवळी ,चालक-गणेश म्हेत्रे यांनी हि कारवाई केली.