शेकडो वर्षाची परंपरा कायम ; विविध धार्मिक कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती
गेवराई : शनि च्या साडेतीन पीठा पैकी मुख्य आद्यपीठ असलेल्या तालुक्यातील श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथे शनि जन्मोत्सव निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.यावेळी अखंड तैलधारात्मक अतिरूद्र अभिषेक व किर्तन महोत्सवाचे दि.२४ डिसेंबर पासुन अयोजन करण्यात आलेले असून दि.३० डिसेंबर रोजी वे.शा.सं.रेणुकादास गणपत शास्त्री पाठक यांचे ४ ते ६ किर्तन झाले. यानंतर सायंकाळी ६ वाजता श्रीशनी जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या वेळी जिल्हयासह परराज्यातील भाविक शनि महाराज जन्मोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गेवराई तालुक्यातील असलेल्या गोदातिरा वरील श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथे हजारो वर्षा पूर्वीच्या प्राचीन शनि मंदिराचा इतिहास पुरातन काळापासून आहे. याच ठिकाणी श्रीशनी महाराज जन्मोत्सव शेकडो वर्षा पासून पौष शुद्ध अष्टमी ला साजरा केला जातो. शुक्रवार रोजी दि.३० डिसेंबर ला संध्याकाळी ६ वाजता हजारो भक्त मंडळीच्या उपस्थिती मध्ये शनि जन्मोत्सव साजरा झाला. या उत्सवात गेल्या आठ दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. तर यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची किर्तन सेवा झाली. तर दि.१ जानेवारी २०२३ रविवार रोजी ह.भ.प.नागेश महाराज लिंग्रस यांच्या भव्य काल्याच्या कीर्तनाने उत्सावाची सांगता होणार आहे. दरम्यान शुक्रवारी शनि जन्मोत्सव सोहळ्यासाठी राज्यासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री शनि महाराज ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, तरुण मंडळी , शनिप्रसाद वारकरी शिक्षण संस्था, राक्षसभुवन, तसेच ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत.