बीडच्या टिमचीही सेवा
बीड: लोकप्रतिनिधी म्हणून मतदारांबद्दल दायित्व आणि
आपल्याला मिळालेल्या मंत्रीपदाचा उपयोग मतदार संघातील
तळागळातील जनतेपर्यंत कसा पोचविता येतो हे राज्याचे आरोग्य
मंत्री तानाजी सावंत यांनी महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून
सिद्ध केले आहे.
रविवार व सोमवार असे दोन दिवस हा आरोग्याचा महायज्ञ परांडा
(जि. उस्मानाबाद) येथे होत आहे. रविवारी पहिल्या दिवशीही
लाखभर रुग्णांच्या विविध तपासण्या व उपचार करण्यात आले. या
आरोग्याच्या महायज्ञात बीडच्या आरोग्य टिमनेही चोख सेवा
बजावली.
मंत्रीपदे हे राज्याचे धोरण ठरविणारे असतात. मात्र, मतदारांनी
आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणजे जनसेवक म्हणून निवडलेले
असते याची कायम जाण ठेवून असलेल्या तानाजी सावंत यांना
अगदी सामान्यांच्या हिताचे आणि गरिबांसाठी जीवनसंजीवनी
ठरणारे आरोग्य मंत्रीपद मिळाले आहे. तानाजी सावंत यांनी
खात्याचा पदभार घेतल्यापासूनच अनेक धोरणात्मक बदल केले
आहेत. सुरुवातीलाच त्यांच्या कल्पकतेतून महिलांचा महत्वाचा
सण असलेल्या नवरात्रोत्सवा निमित्त ‘माता सुरक्षित तर घर
सुरक्षित’ अभियान राबविण्यात आले. अभियानातून राज्यभरात
लाखो महिलांच्या विविध तपासण्या व उपचार करण्यात आले.
आता सावंत यांनी आपल्या खात्याचा आपल्या मतदार संघातील
गरिब व गरजू रुग्णांना अधिकाधिक फायदा व्हावा या हेतूने
महाआरोग्य शिबीर आपल्या परांडा या कर्मभूमीत आयोजित केले.
मागच्या महिनाभरापासून शिबीराच्या नियोजनात स्वत: तानाजी
सावंत लक्ष घालून होते. याचे फलित रविवारी पहिल्या दिवशी
दिसून आले. अगदी लाखभर लोकांच्या महत्वाच्या आरोग्य
तपासण्या व उपचार करण्यात आले. नेत्ररोग, अस्थिरोग, भिषक,
कान – नाक – घसा, बालरोग, स्त्रीरोग, शल्यचिकीत्सा अशा
एकाच छताखाली विविध तपासण्या व उपचार करण्यात आले.
शिबीराचे नियोजनही अगदी नेटके असल्याने रुग्णांना कुठलीही
गैरसोय झाली नाही. यानंतर रुग्णांना आवश्य उच्च प्रतिची
औषधीही वाटप करण्यात आली. खुद्द तानाजी सावंत शेवटपर्यंत
लक्ष घालून होते. सोमवारीही शिबीर होणार आहे.
आपल्याला लोकांनी जनसेवक म्हणून दिलेल्या संधीची उतराई
आणि मिळालेल्या पदाचा तळगळापर्यंत उपयोग करण्याची
कार्यसिद्धी तानाजी सावंत यांनी या महाआरोग्य शिबीराच्या
माध्यमातून केली आहे.
—-
महायज्ञात बीडच्या टीमचीही सेवा
—-
राज्याच्या आरोग्याचा भार सक्षमपणे पेलणाऱ्या शेजारच्याच जिल्ह्यातील तानाजी सावंत यांनी आपल्या कर्मभूमीतील तळागळातील लोकांसाठी आयोजित केलेल्या या महाआरोग्य शिबीराच्या महायज्ञात बीडच्या आरोग्य टिमनेही महत्वाची सेवा बजावली. टिमचे सुकाणूधारी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे देखील खुद्द रात्री उशिरापर्यंत यज्ञाच्या नियोजनात आणि बीडच्या टिमचे नियंत्रणात मग्न होते. या सेवेत डॉ. पुनम लोध, डॉ. शाहेला फातेमा, डॉ. सुनिलदत्त यमपुरे, डॉ. सुरज वाकोडे, डॉ. शंकर काशिद, डॉ. बाळासाहेब सांवत, डॉ. हनुमंत पारखे, डॉ. वासंती चव्हाण, डॉ. दिगंबर मुंडे, डॉ. संतोष कदम, डॉ. ज्ञानेश्वर लांडगे, डॉ. अनिल भिसे, डॉ. ऋषीकेश जायभाये, डॉ. बालाजी गुट्टे, डॉ. रवींद्र गालफाडे, डॉ. नितीन रेंगे, डॉ. दिलीप गायकवाड, डॉ. सचिन राऊत, डॉ. सुजीत लहाने, डॉ. ओंकार ताथोडे, डॉ. अबोली पारगावकर, डॉ. समाधान घुगे, डॉ. धर्मपाल शिंदे, डॉ. दबडगावकर, डॉ. दळवी, डॉ. सबा खान यांनी सहभाग घेऊन या यज्ञात आपल्या सेवेचा हातभार लावला.