गुन्हा नोंद करण्यासाठी पोलिस निरीक्षकांना दिले निवेदन
गेवराई, प्रतिनिधी : मंत्री अब्दुल सत्तार यांनी खा.सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून महिला लोकप्रतिनिधींचा अवमान केला आहे. राज्याच्या मंत्र्याकडून असे वक्तव्य करणे म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्यासारखे आहे. खा.सुप्रियाताई बद्दल अपशब्द वापरणाऱ्या मंत्री अब्दुल सत्तारांच्या विरोधात गेवराई राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. माजी आ.अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्यावतीने गेवराई पोलिस ठाण्यात ठिय्या देवून अब्दुल सत्तारांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली. या बाबतचे लेखी निवेदन पोलिस निरीक्षकांना देण्यात आले.
राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खा.सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून देशभरातील महिलांचा अपमान केला आहे. ५० खोक्यांवरून झालेल्या टिकेला उत्तर देताना त्यांनी अतिशय गलिच्छ भाषेत सुप्रियाताईंचा उल्लेख केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित व बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने गेवराई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. राज्याच्या संस्कृतीला काळीमा फासणारी ही घटना असल्यामुळे अब्दुल सत्तारांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी यानिमित्ताने करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा शाहीन पठाण, शहराध्यक्षा मुक्ताताई आर्दड, जय भवानीचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, माजी जि.प.सभापती भरतराव खरात, माजी जि.प.सदस्य बाबुराव काकडे, दत्ता दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष शेख खाजाभाई, सरवर पठाण, सोमनाथ गिरगे, रावसाहेब काळे, वसीम फारुकी, सय्यद उरज, शेख अनिस, शेख राजूभाई, शेख मोहसीन, अतिक बागवान, शाहरुख, शेख शाकेर, वैभव दाभाडे, अमित वैद्य, नविद मशायक, कृष्णकांत पाटील, सय्यद राजू, जयसिंग माने, महिला आघाडीच्या सिमा जवंजाळ, जयश्री दाभाडे, पंढरी गोगुले, किरण दाभाडे, शिला पैठणे, योगीता तांबारे, पुजा दाभाडे, संगीता सागडे, सयाबाई ससाणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व विशेषतः महिला पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांनी अब्दुल सत्तारांच्या विरोधात घोषणा देवून गुन्हा नोंद करण्याची मागणी केली.