विकास कामासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आ.सुरेश धस यांचा सेवक म्हणून काम करणार—–विजय गोल्हार
बीडसांगवी येथे ५ कोटी रूपयाचा रस्ता कामाचा शुभारंभ…
आष्टी प्रतिनिधी:रस्ते झाले पाहिजेत मात्र आमच्या जागेला धक्का लागला नाही पाहिजे ही मानसिकता लोकांची असते.त्यामुळे काम करताना अडथळे निर्माण होतात.त्यामुळे विकास कामे होत असतील तर काही गोष्टीत तडजोड करावी लागते तेव्हा विकास होतो.त्यामुळे या भागातील गावकऱ्यांनी देखील सहकार्य करा असे आवाहन करत दर्जेदार काम करा आणि लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देत.आष्टी,पाटोदा, शिरूर कासार मतदार संघातील विकास कामासाठी मी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले.
ते आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथे ५ कोटी रुपये रस्ते विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी सोमवार दि.७ नोव्हेंबर रोजी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर विजय गोल्हार, रामराव पाटील करांडे,संजय गाढवे,सरपंच माणिक नरवडे,बबन करांडे,यशवंत खंडागळे,सरपंच राहुल काकडे,विजय भगत,अभियंता सौदागर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.धस म्हणाले की,हा भाग कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आहे.मात्र मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाने पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निच्छीतपणे मिळणार आहे.हे सरकार शेतकरी,कष्टकरी,
सामन्यातील सामान्यांचा विचार करणारे सरकार आहे.या बीडसांगवीचा लाईटचा प्रश्न देखील प्रामुख्याने सोडवीला जाईल.प्राथमिक आरोग्य केंद्राचा देखील लवकरच ज्या अडचणी आपण मार्गी लावणार आहोत.जनावरांच्या दवाखान्याची देखील समस्या दूर केली जाईल असेही आ.धस म्हणाले.
कार्यक्रमातील सत्कार टाळत हे काम पूर्ण झाल्यानंतरच आमचा सत्कार करा तो पर्यंत सत्कार घेणार नाही.मार्च अखेर पर्यत दर्जेदार करा आणि पूर्ण करा.या गटात आपण अनेक विकास कामे केली आहेत.5 कोटी रस्ते विकास कामामध्ये खडीकरणाचे दोन थर,डांबरीकरण,आवश्यक जागेवर नळकांडी पूल,काही ठिकाणी सिमेंट काँक्रिट,दोन्ही बाजूने साईट पट्या असा आहे.हा रस्ता कणसेवाडी,गुंडेवाडी,गणगेवाडी,बीडसांगवी,देसुर आदी गावांचा समावेश असून यांना दळणवळण साठी मदत होणार आहे.या गुत्तेदारांचे काम चांगले असल्याने मी बोलावून घेऊन यांना काम दिले आहे.गुत्तेदारांना आ.धस यांनी सूचना करत म्हणाले की,आपण दर्जेदार काम असे करा की,या परिसरातील नागरिकांनी तुमचे नाव घेतले पाहिजे.नागरिकांना आवाहन करत आ.धस म्हणाले की,नागरिकांनी देखील गुत्तेदारांला मदत करावी.तीन ते चार महिन्यात हे काम पूर्णत्वास घेऊन जावे असा सूचना गुत्तेदार व अधिकारी यांना आ.धस यांनी शेवटी बोलताना केल्या.
यावेळी विजय गोल्हार बोलताना म्हणाले,
आपला मतदार संघ जर पश्चिम महाराष्ट्रातील मतदार संघासारखा करायचा असेल तर ते फक्त एकमेव आ.सुरेश धसच करू शकतात कारण त्यांच्यात तशी धमक असून,आपण गट-तट बाजूला ठेऊन फक्त विकास कामासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आ.सुरेश धस यांचा सेवक म्हणून काम करणार असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय गोल्हार यांनी सांगीतले.पुढे बोलतांना गोल्हार म्हणाले,मतदार संघाचा विकास करण्यासाठी आ.सुरेश धस यांच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षापासून त्यांची धडपड सुरू आहे.परंतु आता राज्यात केंद्रात आपले सरकार आहे.त्यामुळे तुम्ही मतदार संघातील दहावे,तेरावे,वर्षश्राध्द तसेच इतर किरकोळ कामे आम्ही बघू तुम्ही मुंबईलाच थांबतआणि मतदार संघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे आणावेत.आम्ही इकडे आ.धस तुमचे सेवक म्हणून काम करु. माझं आणि आ.धस यांचे जमत नसल्याचे ब-यांच जणांचे म्हणणे आहे. आमचे मित्रत्वाचे नाते असून ते आणि मी एका विचाराचे माणसे असल्याने एका दिलाने आम्ही काम करत आहोत.
सुखाला,दुःखाला,आणि विकासाला आपण शेवटपर्यंत एक राहणार आहोत.मी जिवंत असे पर्यंत एक दिलाने भावाभावाप्रमाणे आम्ही काम करणार आहोत. घरात बसून विकास होत नसतो त्यासाठी धस कुटूंबियांचा त्याग हा कुठल्याही तराजूत मोजला जाऊ शकत नाही.या गटात कुठेतरी लिंबुटीबु कामे करायची आणि आ.धस आणि माझ्यावर विरोधात बोलायचे.पंकजा ताई आणि आ.धस यांनी सविता गोल्हार यांना जि. प.अध्यक्ष केले त्यावेळेस सर्वात जास्त निधीचा आपण या गटात आणला आहे. २८ वर्ष वय असलेल्या आ.धस यांच्या जेष्ठ पुञाला मनक्यांच्या ञासाला सामोरे जावे लागतं याचे मुख्य कारण म्हणजे जनसेवेचा घेतलेला वसा स्वस्थ बसून देत नसल्याचे यावेळी गोल्हार शेवटी म्हणाले,
यावेळी गुत्तेदार विशाल तांदळे,शरद भगत,रामा गणगे,सुभाष गणगे,संदीप करांडे,कल्याण मोहरकर,सरपंच दिनेश मोरे,फक्कड नरवडे,
विकास साळवे,तान्हाजी गणगे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संपत ढोबळे तर आभार माजी उपसरपंच बबन करांडे यांनी मानले.