सदरील याञेत चार रथ असणार; चार दिवसाचा प्रवास करुन ही याञा पैठणला पोहचणार!
बीड प्रतिनिधी : शुन्यातुन विश्व निर्माण करणारे आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर संपूर्ण राज्यातून दुःख व्यक्त केले जात आहे. त्यांच्या जाण्याने बीड जिल्ह्याचे कधीच भरुन न निघणारे नुकसान झाले आहे. आज (ता. १९) सकाळी संपुर्ण स्व. आ. विनायक मेटे यांच्या अस्थिकलश याञेस सुरुवात झाली. यात चार अस्थिकलश रथ याञा असून संपुर्ण जिल्ह्यात चार दिवस जाऊन २२ आॅगस्टला पैठणला पोहचणार आहेत. २३ आॅगस्टला अस्थिचे विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष नारायण काशिद यांनी दिली.
स्व. मा. आ. विनायकरावजी मेटे साहेब यांचा अस्थीकलश संपूर्ण बीड जिल्हयात सर्वसामान्य नागरीकांच्या दर्शनासाठी यात्रा काढण्याचा या वेळी निर्धार करण्यात आला. सदरची अस्थिकलश यात्रा शुक्रवार दि. 19 ऑगस्ट 2022 ते 22 ऑगस्ट 2022 पर्यंत जिल्हयातील सर्व तालुका, महत्वाची शहरे व गावाच्या ठिकाणी दर्शनासाठी ठेवण्यात येईल. या यात्रेची सुरूवात शुक्रवार, दि. 19 ऑगस्ट रोजी ठिक 9.00 वा. शिवसंग्राम भवन नगर रोड, बीड येथुन झाली. यात्रेचे विर्सजन श्री क्षेत्र पैठण जि. औरंगाबाद या ठिकाणी मंगळवार दि. 23 ऑगस्ट रोजी होईल. सदर यात्रेमध्ये अस्थिकलेशाचे चार रथ सामील झाले आहेत!