मॅपवर औरंगाबादचा उल्लेख संभाजी नगर तर उस्मानाबादचा उल्लेख धाराशीव
गुगलने शहराचे नाव कशाच्या आधारे बदलले – खा.इम्तियाज जलील
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : राज्य सरकारने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर तर उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता याची दखल गुगल मॅपने सुद्धा दखल घेतली आहे. गुगलने कशाच्या आधारे या जिल्ह्यांची नावे बदलली असा प्रश्न खासदार इम्तियाच जलील यांनी उपस्थित केला आहे.
जलील यांनी गुगलला टॅग करत केलेल्या ट्वीट मध्ये म्हंटले आहे की, औरंगाबाद शहराचे नाव गुगलने कशाच्या आधारावर बदलले आहे हे तुम्ही स्पष्ट करू शकता का?, तसेच ज्या कोट्यवधी नागरिकांसोबत हा खोडसाळपणा करण्यात आला आहे, त्याचं गुगलने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी जलील यांनी केली आहे.
काय बदल झाला आहे…
गुगुल मॅपवर औरंगाबाद किंवा उस्मानाबाद टाईपं केल्यावर इंग्रजीत संभाजीनगर ( ) आणि धाराशिव असा उल्लेख दाखवत आहे. गुगलने हा बदल केल्याने ज्या-ज्या सोशल वेबसाईट गुगल मॅपवरून ऑटो लोकेशन पर्याय देतात त्यांना सुद्धा आता संभाजीनगरच दिसणार आहे. त्यामुळे हा मोठा बदला समजला जात आहे. तर यावरून आता सोशल मीडियावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. समर्थन आणि विरोधात अशा दोन्ही बाजूने पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या जात आहे.