पैठण – सध्या सुरु असलेल्या पावसामुळे राज्यातील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून मराठवाडयासाठी वरदान असलेल्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा वाढत असून सध्या हे धरण 52 टक्के भरल्यामुळे मराठावाडाला मोठा दिलासा मिळाला आहे. अजून सुद्धा धरणात पाण्याची आवक सुुरु आहे. यावर्षी सुद्धा हे धरण भरले व या धरणाचे पाणी येथील शेतकऱ्यांना मिळेल.
नाथसागर धरणातून वर्षभरापासून टप्याटप्याने पाण्याचा शेती सिंचन, औद्योगिक व पिण्याच्या पाण्यासाठी वापर करण्यात येत आहे. सद्यस्थितीत नाथसागर धरणात 52.61 टक्के साठा शिल्लक आहे. नाथसागर धरणातून विविध शहरांना पिण्यासाठी व वाळूज , शेंद्रा , पैठण , जालना औद्योगिक वसाहतीसाठी दररोज 0289 दलघमी एवढा पाणीपुरवठा होत आहे. धरणात सध्या 52.61 टक्के साठा आहे. नाथसागराची पातळी 1,521 फूट आहे. आजपर्यंत मागील वर्षी 51.40 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. तसेच मागील दोन महिन्यांपूर्वी ता. 28 फेब्रुवारी 2022 मध्ये 77.99 तर ता. 31 मार्च 2022 रोजी 65.70 टक्के पाणीसाठा होता.
दरम्यान, मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने सप्टेंबरमध्येच नाथसागर धरण 100 टक्के भरले होते . दरम्यान , यावर्षी वाढते तापमान व पाण्याची मागणी याचा विचार करता पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवहान करण्यात आले होते. पैठणचे धरण भरल्यानंतर या धरणाचा औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्याला मोठा फायदा होतो. यामुळे हे धरण मराठवाड्यासाठी वरदानच ठरत आहेत.