भीमराव धोंडे ,व मी यापुढे मनाने एकत्र राहू;या मागच्या काळातले सगळे पालकमंत्री एकीकडे तर एकट्या पंकजाताईचे काम सर्वात मोठे – आमदार सुरेश धस
पंकजाताई ह्या मोठ्या नेताहेत येणाऱ्या काळात त्यांना राजकारणात मोठे स्थान मिळण्यासाठी आपण सर्व त्यांच्या पाठीशी राहू.. – माजी आमदार भीमराव धोंडे
आष्टी प्रतिनिधी —-उदया होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या धर्तीवर माजी मंत्री तथा भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस यांनी बीड जिल्ह्यामध्ये आपला संपर्क दौरा सुरू केला असून पहिला दौरा आष्टी येथील लक्ष्मी लॉन्स मध्ये संपन्न झाला. या बैठकीला संबोधित करताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की आज या संपर्क दौऱ्यादरम्यान माझे एवढे मोठे अभूतपूर्व स्वागत झाले आहे .की मी भारावून गेले आहे. आज जरी माझ्याकडे कुठलेही पद नसताना आपण एवढे मोठे माझ्यावर प्रेम दाखवले हीच माझी मोठी ताकत आहे .तसेच आज मी कुठे आहे हे पाहण्यापेक्षा पक्ष जिल्ह्यात मोठे करण्यासाठी मी आता रणशिंग फुंकले आहे. याची सुरुवात मी आष्टी विधानसभा करत आहे. मला खात्री आहे या मतदारसंघांमध्ये मला मोठे यश मिळू शकते. यामुळेच मी या ठिकाणी रणशिंग फुंकले आहे. मी पालकमंत्री असताना जे कामे मंजूर केली त्याच कामाचे नारळ सध्याचे पालकमंत्री आणखीन फोडतात. जिल्ह्यामध्ये काय अवस्था आहे? माफियाराज माजला आहे. छोट्या मोठ्या कामासाठी टक्केवारी गोळा केली जाते.आहे .पक्ष भेदभाव केला जात आहे कशाचाच कशाला तामिळ नाही येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका साठी मी प्रत्येक तालुकास्तरावर पाच व्यक्तींची नेमणूक करणार असून ते लोक तालुक्यामध्ये निरीक्षण नेमनार मला अहवाल कळवतील तसेच माजी आमदार भीमराव धोंडे आमदार सुरेश आण्णा धस येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती च्या निवडणुकीमध्ये एकत्र राहून मला साथ देतील मला मुख्यमंत्री म्हणाले की मला फार त्रास होतो असेही त्या बोलण्याला विसरल्या नाहीत.. सध्याच्या घडामोडी वर महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर जास्तीचे बोलण्याचे त्यांनी टाळले आमदार सुरेश धस म्हणाले की बीड जिल्ह्यामध्ये पंकजाताई मुंडे पालकमंत्री असताना सर्वाधिक विकासकामांना निधी मिळाला शेतकरी वर्गाला पीक विमा मिळाला तसेच पक्षी भेदभाव न करता त्यांनी प्रत्येक गावांमध्ये विकास कामांसाठी निधी वाटप केला सध्या जिल्ह्यामध्ये माफियाराज सुरू असून वाळू तस्कर राम मुळे जिल्हा बदनाम झाला आहे तसेच पंकजाताई यांनी केलेल्या विकासकामांमुळे आजच्या काळातील सर्व पालकमंत्री एका बाजूला ठेवले तर पंकजाताई यांच्या विकास कामांचा पारडे एवढे जड होईल तिथे सर्वाधिक असेल भीमराव धोंडे व मी आता यापुढे मनाने एकत्र राहू अशी त्यांनी कोई दिली त्यावर पंकजाताई यांचा दंडुका असणेही तेवढेच आवश्यक आहे. भीमराव धोंडे यांनी आपल्याला विधानसभेत पराभूत झाल्याचा ठपका व अजूनही ते विसरले नाहीत पुन्हा एकदा त्यांनी पंकजाताई समोर सुरेश धस यांचे खद खत व्यक्त केली. यावेळी सभास्थळी द्वारे पंकजा ताईंना मोठा हार घालण्यात आला ढोल-ताशाच्या व पाकळ्यांच्या त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले सभास्थळी हजारांच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जि प सदस्य अमर निंबाळकर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सविता ताई गोल्हार युवा नेते जयदत्त धस अजय धोंडे समाजसेवक विजय गोल्हार सागर धस भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के चंपावती पानसंबळ रामदास बडे राजेंद्र जाधव नगराध्यक्षा पल्लवी धोंडे माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे मुरकुटे उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे दशरथ वनवे रामराव खेडकर सुवर्णाताई लांबून उपसभापती पाटोदा पाटोदा नगराध्यक्ष सय्यद अब्दुल्ला सरपंच सुधीर पठाडे सचिन लोखंडे अमोल शिंदे,अक्षय धोंडे नगरसेवक सुरेश वारंगुळे आदींसह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रम स्थळी येण्याकरिता पंकजा ताईंना संपूर्ण मतदारसंघात रस्त्यावर असल्याने त्यांचे अभूतपूर्व स्वागत होत असल्याने त्यांना नियोजित कार्यक्रम स्थळी येण्यासाठी तब्बल साडेचार वाजले. सभास्थळी एका कार्यकर्त्यांनी पंकजाताई तर मी मुख्यमंत्री होणार अशी घोषणा दिल्यानंतर त्या खळखळून हसल्या. आमदार सुरेश धस यांच्या भाषणांमधून पहिल्यासारखी आक्रमकता दिसून आल्याने कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर देशमुख यांनी केले. तर सूत्रसंचालन जि प सदस्य माऊली जरांगे यांनी केले व आभार देखील त्यांनीच मानले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन गणेश नाना शिंदे जीया भाई बेग सचिन रानडे,किशोर झरेकर विनय पटधरीया भारत भाऊ मुरकुटे यांनी केले.