13 दिवसात 11 वेळा इंधनाचे दर वाढले; पेट्रोल व डिझेल आठ रुपयांनी महागले
पेट्रोल 118 रुपये तर डिझेल 101 रुपये प्रतिलिटर
13 दिवसापुर्वीचे इंधनाचे दर
पेट्रोल – 110.58 डिझेल – 93.35
सध्याचे दर
पेट्रोल – 118.91 डिझेल – 101.61
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : महाराष्ट्रातील पेट्ोलच्या किमती डायनेमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत. त्यामुळे नियमितपणे दर बदलले जातात. दररोज सकाळी सहा वाजता इंधनाचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किंमती वाढतात. गेल्या 13 दिवसात राज्यात डिझेल 08.26 पैसे तर पेट्रोल 08.33 पैसाने वाढले आहे. सतत इंधनाचे दर वाढल्यामुळे महागाईने सर्वसामान्य नागरीक होरपळले जात आहेत. यामुळे दोन्हीही सरकारने मिळून लावलेले अतिकर कमी केल्यास जनतेला त्याचा दिलासा मिळू शकले.
देशात वाढणारे इंधनाचे दर महागाईला निमंत्रण देऊ लागले आहेत. सतत वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे तर येथील जनता महागाईने पुर्ण त्रस्त झाली आहे. परंतु केंद्र सरकारने व राज्य सरकारने जनतेला दिलासा देण्यासाठी विशेष असे प्रयत्न केलेले नाहीत. दोन्ही सरकारने इंधनावर अतिकर लावलेले आहेत. ते कर सरकारने कमी केले तर देशातील व राज्यातील दर मोठ्या प्रमाणात कमी होती. राज्य सरकारने विविध कर इंधनावर लावलेले आहेत. परंतु आज पर्यंत ते कर तसेच आहेत. यामुळे किमान राज्य सरकारने तरी इंधनावरील कर कमी करण्याची गरज आहे. यासह केंद्र सरकारने पण लावलेले कर कमी करावेत पण दोन्हीही सरकारची तयारी दिसत नाही. यामुळे येथील जनता महागाईत होरपळत चालली आहे. वाढत असलेली महागाई कमी करण्यासाठी सर्वच जनतेने आता आवाज उठवण्याची गरज निर्माण झाली आहे.