माजलगाव धरणावर जाऊन पाणी पुरवठा संदर्भात घेतला आढावा:मोटार बसवण्याचे काम युद्धपातळीवर
बीड प्रतिनिधी : बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काडीवडगाव येथील (माजलगाव धरण) येथे जाऊन मा.नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात आढावा घेतला.लवकरच बीड शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले
नगराध्यक्षांनी सांगितले की,सध्या बीड शहराच्या काही भागात पाण्याच्या अडचणी येत असून त्या अडचणी येऊ नयेत यासाठी नव्याने ४९५ एच.पी. चा नवीन पंप बसविण्यात येत आहे. महावितरण च्या माध्यमातून नवीन वीज जोडणी देण्यासाठी विलंब होत असून यासाठी वारंवार बैठका घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला परंतु अद्याप निर्णय झाला नाही.
बीड नगर पालिकेच्या वतीने प्रत्येक बैठकीत फक्त एकच मागणी वारंवार केली जाते की ज्या प्रकारे घरात मिटर बसवले जातात तसेच मिटर प्रत्येक भागात बसवावेत जेणेकरून अंदाजित येणारे बिल भविष्यात येणार नाही. कारण सध्या येणारे बिल हे वाढीव आहे. बीड शहरापेक्षा शेजारील जालना आणि उस्मानाबाद शहरे संख्येने मोठी असून देखील त्याठिकाणी महावितरण कंपनी ने मिटर बसवले आहे तिथे त्यांना कमी बिल येते मग बीड शहरासाठी मित्र का बसवत नाहीत असा सवाल डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी उपस्थित केला.
मिटर बसविण्या संदर्भात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.या पाठपुराव्याला लवकरच यश येईल व नवीन वीज जोडणी अमृत अटल योजने अंतर्गत च्या कामाला गती येईल.परंतु उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याची मागणी वाढत असल्याने यातून तातडीने मार्ग काढत सध्या ४९५ एच.पी. नवीन एक पंप व २०० एच.पी. चा एक पंप बसवून महावितरण कडून यापूर्वी मंजूर असलेले विद्युतभारा मध्ये शहरास १० एम.एल.डी. पाणी वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत. यामुळे बीड शहराला पाण्याचा कालावधी कमी होऊन काही दिवसात पाणी कमी कालावधीत मिळेल. आत्ताच्या पाणी पुरवठ्यात सुधारणा होईल. काल नगराध्यक्षांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आढावा घेतला. तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करून शहर वासियांना होणारा त्रास व त्यांच्या पण्यासंदर्भातील अडचणी दूर करण्याच्या सूचना मा.नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी संबंधित एजन्सी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.