कर्नाटक राज्यात पेट्रोल १० तर डिझेल ८ रुपयांनी स्वस्त
गेल्या अनेक वर्षापासून इंधनात ही तफावत
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : दिवसेंदिवस इंधनात होत असलेली दर वाढ महागाईत भर टाकत आहे. कच्चा तेलाचे दर वाढले की इंधनाचे दर वाढतात. यासह दुष्काळ आला की इंधनावर अतिकर लावले जातात, परंतु हा कर दुष्काळ संपल्यावर सुद्धा काढण्यात येत नाहीत. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र सरकार इंधनावर अतिकर लावून सर्व सामान्यांची एक प्रकारे लुट करत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रा शेजारील कर्नाटक राज्यात पेट्रोल १० रुपये तर डिझेल ८ रुपयांनी स्वस्त आहे. त्या राज्याला जमते मग आपल्या राज्याला का जमत नाही? अशा प्रश्न उपस्थित होत आहे. मायबाप सरकार इंधनावरील कर कमी करुन राज्यातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
आपल्याकडे वाहतुकीवर खूप काही गोष्टी अवलंबून आहेत, यामूळे इंधनाचे दर वाढले की त्याचा थेट परिणाम महागाईवर होतो. महागाई दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे याचा फटका नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने इंधनावर अतिकर लावल्यामुळे इंधनाचे दर प्रचंड वाढले आहेत. दोन्हीही सरकारने जर इंधनावरील कर कमी केले तर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल. परंतु तशी मानसिकता दोन्हीही सरकारची दिसत नाही. कर्नाटक सरकारचे अभिनंदनच करावे लागेल. त्याठिकाणी पेट्रोल दहा रुपये तर डिझेल आठ रुपयांनी स्वस्त आहे. जे कर्नाटक सरकार करु शकते ते महाराष्ट्र सरकार पण करु शकते. परंतु हे सत्ताधारी असे करणार नाहीत. दोन्हीही राज्यातील ही तफावत गेल्या अनेक वर्षापासुन आहे. राज्यातील महागाई राज्य सरकार सहज कमी करु शकते. पण तशी मानसिकता राज्य सरकारची दिसत नाही. सरकारने तात्काळ लावलेले अतिकर कमी करुन सर्व सामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
सध्याचे दोन्हीही राज्यातील दर
कर्नाटक
पेट्रोल : 101.10
डिझेल : 85.51
महाराष्ट्र
पेट्रोल : 111.21
डिझेल : 93.37