बीड प्रतिनिधी – धारुर तालुक्यातील अंजनडोह येथील शेतकरी बालासाहेब धापसे यांची कन्या अश्विनी बालासाहेब धापसे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षेत महाराष्ट्रात एन टी सी प्रवर्गातुन मुलींमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. परीस्थीती संघर्ष करत तिने हे यश मिळवले या यशामुळे तिचे पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पुर्ण होणार असून तिच्या यशाबद्दल सर्वञ कौतूक होत आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019 पोलिस उपनिरीक्षक पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एन टि सी गटात मुलींतून धारुर तालुक्यातील अंजनडोह गावची अश्विनी बालासाहेब धापसे हिने प्रथम क्रमांक मिळवला.
तालूक्यातील अंजनडोह येथे धनगर समाजाचे कुंटूंबात जन्मलेली वडील पाच एक्कर शेती करून मेंढ्या सांभाळून कुंटूंबाचा उदरनिर्वाह सांभाळत दोन मुले व मुलीचे शिक्षण पुर्ण केले यांत अश्विनी धापसे हिने दहावीपर्यंतचे शिक्षण अंजनडोह येथे तर कोल्हापूर येथे अभियांत्रिकी शिक्षण घेतले. औरंगाबाद येथे ज्येष्ठ बंधू योगिनंद बाळासाहेब धापसे यांच्या सोबत राहुन त्यांच्या प्रेरणेने स्वअध्ययन करत पुणे येथे स्पर्धा परीक्षेचे तास केले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरिक्षक पदाच्या 2019 च्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवले.
अंजनडोह येथे दोन भाऊ, आई व वडील अशा जेमतेम पाच माणसांच धापसे कुटुंब आहे. मोठा भाऊ डि फार्मसी करून खाजगी औषध कपंणीत काम करतो . त्यांने अश्विनी ला यशस्वी होण्या साठी सतत मदत केली काही काळ मेंढपाळ करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबात मुलगी अश्विनी हिने मोठे यश संपादन केले. कोरडवाहू शेती करून उदरनिर्वाह करत शालेय शिक्षण पुर्ण करणाऱ्या धापसे कुटूंबिय व अश्विनी धापसे हिचे अभिनंदन होत आहे.