बीड : अंबाजोगाई लातुर रोडवरील बर्दापुर जवळ असणाऱ्या नंदगोपाल डेअरी जवळ आज (ता. 09) बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली, यात वाहकासह इतर तीन जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले आहेत. अपघात एवढा भिषण होता की दोन्हीही वाहने एकमेकांना धडकल्याने चिकटली होती. यामुळे क्रेनची मदत घेऊन जखमींना बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली होती. जखमींवर बर्दापुर व अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
लातुर -औरंगाबाद ही बस प्रवाशी घेऊन अंबाजोगाई कडे जात होती तर अंबाजोगाई हुन लातुरकडे एक ट्रक माल घेऊन जात होता. ही दोन्हीही वाहने बर्दापुर परिसरातील दुध डेअरी जवळ आले असता दोन्ही वाहनांची समोरासमोर जोराची धडक झाली. दोन्हीही वाहनांचा वेग जास्त असल्यामुळे यात दोन्हीही वाहनांचे प्रचंड नुकसान व जिवीत हानी झाली. बसची डावी बाजू अर्धी फाटली आहे, यावरुन आपण अंदाज काढू शकतोत की, दोन्हीही वाहनांचा वेग किती असेल. यात चार जणांना मृत्यू झाला तर 12 जणांवर बर्दापुर व अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उचपार सुरु आहेत. जखमींना बाहेर काढण्यासाठी पोलीस व स्थानिक नागरीकांनी मोठी मदत केली.
मृत व जखमी झालेले
बस व ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने बसवाहक चंद्रशेखर मधुकर पाटील (रा. कांचनवाडी, औरंगाबाद), आदिल सलीम शेख (रा. अंबाजोगाई), नलिनी मुकुंदराव देशमुख (रा. ज्योतीनगर औरंगाबाद), सादेक पटेल (रा. राडीनगर लातुर) या चौघांचा मृत्यू झाला तर सुदंरराव ज्ञानोबा थोरात (रा. पांगरी ता. धारुर), हरिनाथ रघुनाथ चव्हाण (रा. लातुर), अल्लाउद्दीन अमीर पठाण (रा.निलंगा), अरेमत तालीम पठाण (रा. लातुर), जियान फईम पठाण (रा. लातुर), भागवत निवृत्ती कांबळे (रा. लातुर), योगिता भगवंत कदम (रा. लातुर), दस्तगीर आयुब पठाण (रा. निलंगा), प्रशांत जनार्दन ठाकूर (रा. शेंडी), सुभाष भगवान गायकवाड (रा. पिंपळगाव), आयन फईम पठाण (रा. लातुर), माधव नरसिंगराव पठारे (रा. जालना), बळीराम संभाजी कराड (रा. खोडवा सावरगाव) हे प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर बर्दापुर व अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.