माजी लष्कर प्रमुख बिपिन रावत यांना कीर्तनातून वाहिली श्रद्धांजली..
बीड -(प्रतिनिधी) चांगले काम करणाऱ्या लोकांना त्रास देणारे खूप असतात फळ असलेल्या झाडांनाच दगडाचा त्रास सहन करावा लागतो. संत महात्म्यांना देखील मोठ्या प्रमाणात समाजाने त्रास दिला. मात्र त्याच संतांनी समाजाच्या उद्धाराचा मार्ग दाखवला.आज समाज त्यांचा जयजयकार करतोय त्याच संतांनी सांगितलेला सोपा मार्ग नामस्मरण होय असे प्रतिपादन श्री ह भ प प्रा नाना महाराज कदम यांनी केले. श्री क्षेत्र दत्त मंदिर कोल्हारवाडी संस्थान येथे आयोजित भव्य अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प गुंफताना ते बोलत होते यावेळी श्री ह भ प श्रीहरी महाराज पवार श्री ह भ प सुरेश महाराज जाधव श्री ह भ प तुळशीदास महाराज शिंदे चाकरवाडीचे पोलीस पाटील नानासाहेब काकडे,योगेश महाराज जोगदंड, अक्षय महाराज मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती
श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थान याठिकाणी दत्त जन्मोत्सवानिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दत्ता उपासक श्रीहरी महाराज पवार यांनी केले. या सप्ताहात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प गुंफताना श्री ह भ प नाना महाराज कदम यांनी संत एकनाथ महाराज यांच्या नाम मुखी सदा धन्य तो संसारी !वाया हाव भारी होऊ नये!
तारक ते नाम तारक ते नाम ! तारक ते नाम विठोबाचे!!
या अभंगावर सुंदर चिंतन मांडले, कलियुगामध्ये जीवाला तरून जाण्यासाठी नामच श्रेष्ठ आहे त्यामुळे नामस्मरण केले पाहिजे,ज्याच्या मुखात नाम आहे तोच संसारात धन्य आहे. संतांनी नामाचा महिमा सर्व ठिकाणी वर्णन केला आहे संथ शांत आणि श्रीमंत असे संत एकनाथ महाराज संसारातून तारुण्य जाण्यासाठी सोपा मार्ग लोकांना सांगतात विठ्ठलाचे नाम हे तारक आहे त्या नावाचे स्मरण करा असा आग्रह देखील करतात. त्यावेळी महाराजांनी वेगवेगळी उदाहरणे देऊन नामाचे महत्त्व पटवून दिले. तसेच चांगले काम करणाऱ्या माणसाला मोठा अडचणीचा सामना करावा लागतो त्रास देखील होतो मात्र त्या माणसाने चांगलं काम कधी थांबवायचे नाही एक दिवस समाजाला पडल्यानंतर त्याच्या कामाचे कौतुक होईल आणि त्यांचा कीर्ती सुगंध दूर पर्यंत जाईल असं नाना महाराज कदम म्हणाले तसेच देशासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या आणि समाजासाठी करणाऱ्यांना नेहमी सहकार्य केलं पाहिजे असा सल्ला देखील त्यांनी दिला समाजामधील विभक्त कुटुंब पद्धती, संस्कार, व्यसनाधीनता, यावर प्रबोधन केले. दत्त उपासना श्री हरी महाराज पवार हे संप्रदायाचं खूप मोठं काम करत आहेत गोरगरीब लोकांना मदत करणे व विधायक उपक्रम राबवणे हे लक्षण असतात असं नाना महाराज कदम म्हणाले.
संत बंकट स्वामी महाराज संत भगवान बाबा संत वामनभाऊ ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडी कर या संतांच्या वारकरी विचार लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे काम श्रीहरी महाराज पवार करत आहेत त्यांच्या कामाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी साथ-संगत भजन सम्राट अभिमान महाराज ढाकणे, भजन सम्राट संतोष महाराज मलकापूर व सर्वं गायक वादक व हजारो भाविक भक्त यावेळी प्रमुख उपस्थिती होती
देश सेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या शहीद जवानांचे बलिदान लक्षात ठेवा आपण घरात सुखाची झोप घेतो याच सर्वस्वी श्रेय भारतीय सैनिकांना आहे. दुर्दैवाने तामिळनाडू मध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेल्या माजी लष्कर प्रमुख बिपीन रावत, व इतर सैनिकांना कीर्तनातून श्रद्धांजली वाहिली या वेळी ए मेरे वतन के लोगो जरा याद करो कुर्बानी हे गाणे म्हणताना कीर्तनमंडपात भाविकांच्या डोळ्यात पाणी तरळले.