शहराच्या विकासासाठी मोर्च्यात युवकांनी पुढाकार घ्यावा
बीड (प्रतिनिधी):– बीड नगरपालिका मागील ३५ वर्षापासून क्षीरसगरांच्या ताब्यात आहे. एवढ्या वर्षांमध्ये बीड शहराचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलण्याचे काम त्यांनी करणे आवश्यक होते. राज्यसरकार व केंद्र सरकार यांच्याकडून प्रत्येक वर्षी शेकडो कोटी रुपये विकासाच्या नावाखाली बीड शहरासाठी येत असतात. परंतु क्षीरसागर यांनी विकासाच्या नावाखाली शहराचा विकास करण्या ऐवजी बीड शहराला भकास करण्याचे काम केले.
पाणीपुरवठा, रस्ते चांगले करण्यासाठी, भूमिगत गटात योजनेसाठी स्वच्छतेसाठी घरकुलांसाठी
कोटीच्या योजना आलेल्या आहे. मात्र वर्षानुवर्षे हे काम रखडलेले पाहायला मिळतात. आणि त्याचा त्रास बीडवासियांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बीडवासियांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. म्हणून शिवसंग्रामने वेळोवेळी आ. विनायकरावजी मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडवासियांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. आणि यापुढेही करत राहू, शिवसंग्रामने रस्त्याचे काम लवकर सुरू व्हावे,म्हणून आंदोलन केले, उपोषणे केले स्वच्छता मोहीमा हातामध्ये घेतल्या, गटारी साफ केली, नदी साफ केली. असे कार्यक्रम सातत्याने शिवसंग्राम राबवत आहे. आज सुद्धा आणि पावसाळा संपल्यावर आता मुबलक पाणी असताना पण बीडवासियांना कुठे १५ दिवसांनी तर कुठे १० दिवसांनी नगरपालिकेकडून पाणी मिळत आहे आता मुबलक पाणी असताना जर ही अवस्था आहे तर उन्हाळ्यात काय अवस्था बीडकरांची होईल याचा विचार न केलेला बरा म्हणून बीड शहरातील अनेक महत्त्वाच्या नागरी प्रश्नांवर शिवसंग्रामनी येत्या गुरुवारी ९ डिसेंबर २०२१ स. ११:०० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नगरपालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे या आंदोलना मध्ये सर्व बीडवाशीयांनी सहभागी व्हावे व क्षीरसागरांच्या भ्रष्टाचारी आणि मनमानी कारभाराला आळा घालावा असे आव्हान शिवसंग्रामचे युवक शहराध्यक्ष प्रशांत डोरले यांनी केल आहे.