• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, July 1, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Home ताज्या बातम्या

बीडच्या नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकणार-आ.संदिप भैय्या क्षीरसागर

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
December 6, 2021
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
माजी मंत्र्यांना धक्का, वैजीनाथ तांदळेंसह पाच गावचे सरपंच,चेअरमनसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
बीड (प्रतिनिधी):- आम्ही लोकांसमोर प्रामाणिक भूमिका घेवून जातोत म्हणूनच लोक विश्‍वास ठेवतात. यापुढे कुठल्याही निवडणूका असो झेंडा तर राष्ट्रवादी काँग्रेसचाच लागेल. यापुढे मॅनेजमेंटचे राजकारण चालणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका राहिल. बीड नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकणार असून निवडणूकीत दिलेल्या शब्दांची पुर्तता विकास कामांच्या माध्यमातून सुरू आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिली. शिवसेनेचे जिल्हा सचिव वैजीनाथ नाना तांदळे यांच्यासह पाच गावचे सरपंच, चेअरमन, शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते बोलत होते. वैजीनाथ तांदळे यांच्या प्रवेशाने राजुरी सर्कल वन साईड झाले असून या प्रवेशाने माजी मंत्री आणि नगराध्यक्षांना चांगलाच धक्का बसला आहे.
सोमवार दि.6 डिसेंबर रोजी बीड शहरातील राष्ट्रवादी भवन येथे शिवसेनेचे जिल्हा सचिव वैजीनाथ तांदळे यांच्यासह अनेक गावचे सरपंच सेवा सोसयटीचे चेअरमन व शेकडो कार्यकर्त्यांनी आ.संदिप भैय्या क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.उषाताई दराडे, ज्येष्ठ नेते अ‍ॅड.डी.बी.बागल यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर आसाराम भाऊ गायकवाड, बबनराव गवते, महादेव उबाळे, कल्याण आखाडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.यावेळी  वंजारवाडी, लिंबारुई, रुईलिंबा तिपटवाडी ,तांदळवाडी पिंपरगव्हाण ,सोनगाव ,काठवाडी साक्षाळपिंपरी, केतुरा आदी गावातील कार्यकर्ते यानी प्रवेश केला.
यावेळी आ.संदिप भैय्या क्षीरसागर म्हणाले की, नाना मनाने चांगले आणि पक्के आहेत. या परिवाराचं प्रेम आणि विरोध दोन्ही पाहिलेला आहे. वंजारवाडी राजुरीपासून वेगळी नाही. यापुढे नानांसह प्रवेश करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान आणि संधी दिली जाईल. प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आणि आशिर्वादामुळे मी आमदार होवू शकलो. येणार्‍या निवडणूकीमध्ये कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल आणि जनतेच्या आशिर्वादाच्या बळावर राष्ट्रवादीच काँग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्‍वासही आ.संदिप क्षीरसागर यांनी व्यक्त करत निवडणुकीत जे-जे शब्द दिले होते ते पूर्ण करू. पुर्वी जे मॅनेजमेंटचे राजकारण चालयचं ते आता चालणार नाही. राजुरी आता वन साईड झाली आहे, बाकीच्या सर्कलमध्येही दिग्गजांचे प्रवेश होतील. येणार्‍या काळात शहरी आणि ग्रामीण भागात विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी बोलतांना माजी आ.सय्यद सलीम म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आ.संदिप भैय्या सरळ आहेत. सर्वांना सोबत घेवून शहरी आणि ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांच्या माध्यमातून बीड शहरातील विविध विकास कामे मार्गी लागत आहेत. प्रवेश करणार्‍या प्रत्येकाला संधी मिळेल आणि सन्मान होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तर माजी आ.सुनिल धांडे म्हणाले की, आ.संदिप भैय्या दिलदार मनाचे असून पवार साहेबांचे लाडगे आमदार आहेत. इमानदार कार्यकर्त्याला ते संधी देतील असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ रहा असे आवाहनही त्यांनी केले. तर ज्येष्ठ नेते अ‍ॅड.डी.बी.बागल म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि ताकद घराघरापर्यंत पोहचवा आणि येणार्‍या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवा असे आवाहनही त्यांनी केले तर माजी आ.उषाताई दराडे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याला संधी आणि सन्मान देत असतांना सर्व सामान्यांची कामे देखिल मोठ्या प्रमाणात होत आहेत. यापुढे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असे म्हटले आहे. यावेळी तांदळवाडी ग्राम पंचायतचे सरपंच बाळसाहेब फड, उपसरपंच जीवन मनोहर सांगुळे, माजी सरपंच श्रीराम सांगुळे, ग्रा.पं.सदस्य अजय सानप, सुधाकर कांबळे, चेअरमन बाबासाहेब सांगुळे, ग्रा.पं.सदस्य त्र्यंबक सानप, रावसाहेब केदार, किरण सानप, विष्णु केदार, अशोक सांगुळे, बाबु नागरगोजे, केतुरा येथील विजय गिरी मित्र मंडळ, लिंबारूई येथील बबलू दराडे नितीन बिनवडे व ग्राम पंचायत सदस्य तथा उपसर्कल प्रमुख शिवसेना अशोक दराडे, शिवाजी दराडे, गणेश मोटे, से.सो. चेअरमन उत्तम दराडे, से.सो.संचालक  नंदकुमार दराडे, मनोहर ठेंगल, हनुमना दराडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख नसीर शेख बशीर, उपाध्यक्ष सुनिल बाबासाहेब दराडे, सखाराम ठाणगे, नामदेव दराडे, रविंद वाघमारे, शेख शब्बीर भाई,  पिंपरगव्हाण ग्रा.पं. उपसरपंच मारोती मतकर, ग्रा.पं.सदस्य परमेश्‍वर आगाम, शहादेव आगाम, ग्राम पंचायत अव्वलपुर/सोनगाव सदस्य बळीराम घिगे, महादेव भांगे, लिंबाजी घिगे, दत्ता घिगे, बंकट घिगे, बबन घिगे, बबन घिगे, रोहिदास घिगे, सोमा चव्हाण, केशव घिगे, सुुनिल चव्हाण, काठवटवाडी ग्रा.पं.सदस्य भाऊसाहेब जानवळे, कृष्णा जानवळे, युवा नेते श्रीधर जानवळे, साक्षाळपिंप्रीचे गजानन क्षीरसागर, तारेख शेख, गावर्धन काशीद, फिरोज सय्यद, राजा काशीद, बजरंग गाडे, शिवराज काशीद, युवराज काशीद, श्रीहरी काशीद, उमेश काशीद, राजाभाऊ काशीद, मच्छिंद्र काशीद, भागवत काशीद, रूद्रापुर ग्रा.पं.चे सरपंच शरद आघाव, ग्रा.पं.सदस्य रामनाथ आघाव, सुनिल नागरगोजे,  सुग्रीव नागरगोजे, कृष्णा सानप, राजु तळेकर, गणेश भुसारी, अजय नागरगोजे, तिप्पटवाडी ग्रा.पं.चे सरपंच विेष्णु शेंडगे, ग्रा.पं.सदस्य ज्ञानदेव घिगे, शिवाजी एकाळ, दादा पवळ, वंजारवाडी ग्रा.पं.सरपंच अरूण धुरंधरे, उपसरपंच विकास तांदळे, सदस्य महादेव कुटे, अंगद तांदळे, बाबासाहेब तांदळे, लक्ष्मण पवार, से.सो. चेअरमन सुदाम पवार, पांडुरंग राख, शहादेव तांदळे, ज्ञानोबा ढाकणे, अशोक धुरंधरे, बाबासाहेब चव्हाण, प्रभाकर चव्हाण, चंद्रनाथ कुटे, नामदेव कुटे, विश्‍वनाथ तांदळे, सुभाष गांगुर्णे, ग्रा.पं. रूईलिबंाचे शिवसेना उप तालुका प्रमुख बीड मनेश भोसकर, से.सो.चेअरमन सदाशिव साळुंके, माजी सरपंच दिलीप भोसकर, माजी सरपंच शहादेव गिरी, गणेश भोसकर, मिठ्ठु शेख, आत्माराम ओव्हाळ, अजिम सय्यद, रामदास पुरी, शहाजहानपुरचे कैलास सोनवणे, लखन गिरी व रावसाहेब भोसकर, शिवाजी भोसकर, विलास पवार, क्षमु पिसाळ, रामदास पुरी, यशवंत कडबाने, संदिपान भोसकर, रहिमान शेख, अकबर शेख, आत्माराम ओव्हाळ, तय्युब शेख, गुलाब गिरी, भानुदास पुरी, पांडुरंग कडबाने, गणपत राहींज, अजीम सय्यद, विशाल ओव्हाळ, सतिश नन्नवरे, संभाजी साळुंके, दत्ता भोसकर, अमोल ओव्हाळ, अविनाश कुटे, रोहन कांबळे, राधाकिसन जाधव, बाबु जाधव, विकास भोसकर, योगेश साळुंके, आकाश पवार, मईबुद्दीन शेख, शिवाजी खरात, विष्णु घाडगे यांनी प्रवेश केला.
ये तो टेलर हैं, पिक्चर अभी बाकी हैं-वैजीनाथ नाना तांदळे
कार्यकर्त्यांचे उपकार मी विसरू शकणार नाही, प्रवेश करतांना आनंद होत आहे. माझ्या गावात दर दिवसाला पाणी देतो परंतू पाणी उपलब्ध असतांना बीड शहराला पंधरा दिवसाला पाणी मिळत आहे. बीड शहरात घाणीचे साम्राज्य असून ही राजकारणतली घाण साफ करायची आहे. स्व.काकूंना वंजारवाडीतून बिनविरोध ग्रा.पं.सदस्य ज्येष्ठ मंडळींनी दिल्यानंतर काकू राजुरीच्या सरपंच झाल्या. तेंव्हापासून क्षीरसागर कुटुंबाशी प्रेमाचे संबंध आहेत. मध्यंतरी काही गैरसमजातून दुरावा झाला, ज्यांच्याकडे गेलो त्यांनी मात्र विश्‍वासघात केला असे म्हणत त्यांनी माजी मंत्री व नगराध्यक्ष पिता-पुत्रावरही कडाडून टिका केली. येणार्‍या काळात माझ्या बरोबर प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्याला सन्मान व संधी मिळेल असा विश्‍वास व्यक्त करत त्यांनी उपस्थितांना आ.संदिप भैय्यांच्या पाठिशी ताकद उभी करा असे आवाहन केले. ये तो टेलर हैं, पिक्चर अभी बाकी हैं असे म्हणत येणार्‍या काळात राष्ट्रवादीचेच दिवस असतील असेही त्यांनी म्हटले आहे.





Previous Post

९ डिसेंबर रोजी नगर पालिकेवर शिवसंग्रामचा जन आक्रोश मोर्चा निघणारच – प्रभाकर कोलंगडे

Next Post

संपामुळे एस.टी. वाहकाला रस्त्यावर पादत्राणे शिवून पॉलिश करण्याची वेळ !

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025
जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

June 28, 2025
80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

June 25, 2025
आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

June 24, 2025
माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025
खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

June 16, 2025
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
Next Post
संपामुळे एस.टी. वाहकाला रस्त्यावर पादत्राणे शिवून पॉलिश करण्याची वेळ !

संपामुळे एस.टी. वाहकाला रस्त्यावर पादत्राणे शिवून पॉलिश करण्याची वेळ !

बीड नगर परिषदेवरील शिवसंग्रामच्या जन आक्रोश मोर्चात सहभागी व्हा- रामहरी मेटे

बीड नगर परिषदेवरील शिवसंग्रामच्या जन आक्रोश मोर्चात सहभागी व्हा- रामहरी मेटे

मोठी बातमीः आमदार सुरेश धस यांच्यावर 1 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, विविध देवस्थानांची 450 एकर जमीन लाटली?

मोठी बातमीः आमदार सुरेश धस यांच्यावर 1 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, विविध देवस्थानांची 450 एकर जमीन लाटली?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा