गेवराई प्रतिनिधी सुदर्शन देशपांडे
येथील आगार प्रमुखाला 15 हजाराची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. कारवाई औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नवीन बसस्थानकालगत असलेल्या एका हाँटेलमध्ये केली आहे
. गेवराई येथील . श्रीनिवास वागदरीकर असे लाच घेणाऱ्या आगारप्रमुखाचे नाव आहे.
येथील आगार व्यवस्थापक वागदरीकर यांनी या आगारातील भांडारपाल यांच्याकडे तुझा स्टोअरचा रिपोर्ट करणार नाही, म्हणून तीस हजार रुपयाची लाचेची मागध केली होती. यानंतर तडजोडीअंती 15 हजार देण्याचे ठरले. दरम्यान याबाबत तक्रारदार यांनी औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वागदरीकर यांची तक्रार केली होती. याबाबत लाचलुचपत विभागाकडून पडताळणी केली असता वागदरीकर हे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बसस्थानकालगत असलेल्या हाँटेलमध्ये सापळा रचून वागदरीकर यांना 15 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यानी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात कारवाईची प्रक्रीया सुरू आहे. या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे