प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत आज दुपारी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या योजनेतल्या पुढील हप्त्याचे वितरण करणार आहेत.
या योजनेद्वारे १९ हजार ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचं वितरण होणार असून त्याचा लाभ ९ कोटी ७५ लाख लाभार्थी शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. या कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्री लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून, राष्ट्राला संबोधितही करणार आहेत.
पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६ हजार रुपये तीन समान मासिक हप्त्यांमध्ये दिला जातो. हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जातो. या योजनेद्वारे शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत १ लाख ३८ हजार कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं आहे. केंद्रीय कृषीमंत्रीदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.