पाणी पुरवठा व स्वच्छता व्यवस्था सुरळीत करा, अन्यथा आंदोलन : गटनेत्या सौ उज्वला शिनगारे
किल्ले धारूर : नगरपरिषद किल्ले धारूर मुख्य अधिकारी श्री बागुल यांना (ता १२ ) एप्रील रोजी शहारातील पाणी पुरवठा सुरळीत करावा, तसेच शहारातील नाली साफ सफाई व कचरा संकलन तात्काळ करण्यात यावे अन्यथा कोरोना साथीचे नियम पाळुन कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन गटनेत्या सौ. उज्वला सुधीर शिनगारे यांनी मुख्याधिकारी यांना दिले.
किल्ले धारुर शहरा मध्ये भर उन्हाळयाचे दिवसात पाणी पुरवठा सतत खंडीत होत असुन नागरीकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. सध्या कोरोना साथीच्या प्रार्दुभाव नागरीकांनी पाण्यासाठी भटकंती करावी लागत असुन यामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच शहरामध्ये गेल्या दोन महिन्यापासुन नाली साफ सफाई व कचरा संकलनाचे काम होत नसुन
ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे, यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आहे.तरी किल्ले धारुर शहारातील पाणी पुरवठा सुरळीत करावा, तसेच शहारातील नाली साफ सफाई व कचरा संकलन तात्काळ करण्यात यावे अन्यथा कोरोना साथीचे नियम पाळुन कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन सौ. उज्वला सुधिर शिनगारे यांनी मुख्याधिकार्यास देऊन अंदोलनाचा ईशारा दिला आहे.